शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

दांडीबहाद्दर शिक्षकांवर कारवाईची मागणी, गोसावीवाडी शाळेतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:16 AM

गोसावीवाडी (ता. इंदापूर) येथील दोन शिक्षकी शाळेत बुधवारी शिक्षकांनीच दांडी मारल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांविनाच अध्ययन करण्याची वेळ आली होती.

कळस : गोसावीवाडी (ता. इंदापूर) येथील दोन शिक्षकी शाळेत बुधवारी शिक्षकांनीच दांडी मारल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांविनाच अध्ययन करण्याची वेळ आली होती.या प्रकरामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून, संबंधित दोन्ही शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.इंदापूर तालुक्यातील कळस केंद्रातील गोसावीवाडी शाळेत २१ मुले शिक्षण घेत आहेत. याठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, सोमवारपासून एक शिक्षक शाळेकडे फिरकलाच नाही. एक शिक्षक सकाळी येऊन येथील वर्ग खोल्यांचे कुलूप उघडून थोडावेळ थांबून गावाकडे निघून गेला. दुपारी तीन वाजेपर्यंत शिक्षकाविना विद्यार्थी शाळेत बसून होते.ग्रामस्थांना याची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली. त्या वेळी ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पालकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.लोकसहभागातून शाळेचे ग्रामस्थांनी रूप पालटले आहे. तसेच विविध सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागत असतानाच शिक्षकच कुठलीही कल्पन न देता गैरहजर राहिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून काय आदर्श घ्यायचा, असा सवालही या वेळी पालकांनी उपस्थित केला.याठिकाणी दोन शिक्षक आहेत. मात्र आज एकही शिक्षक शाळेत दुपारी तीन वाजेपर्यंत दिसून आला नाही. मुलांना विचारले असता त्यांनी गुरुजी येऊन गेल्याचे सांगितले. आम्ही पाच ते सहा ग्रामस्थांनी शाळेत येऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.- अंबादास गावडे,ग्रामस्थशाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती ढासळली आहे. शिक्षक कधीही येतात, कधीही जातात. आज घडलेला प्रकार खरा आहे. त्यांनी झालेल्या चुकीबद्दल ग्रामस्थांसमोर माफी मागितली आहे.- कैलास गावडे,शाळा समिती अध्यक्ष

टॅग्स :Puneपुणे