खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या ३७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी कात्रज दूध संघाचे संचालक भगवान पासलकर, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे, संचालक अरुण थोरात, नानासाहेब थोरात, जी.के. थोरात, सचिव सुदाम भापकर, सहसचिव सूर्यकांत खैरे, प्राचार्य हिंदुराव जाधव, उपसरपंच निखिल थोरात, माजी सरपंच शिवाजी थोरात आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम ऑनलाइन झूम ॲप व लाइव्ह यूट्यूब च्या माध्यमातून इतर शाखा व विद्यार्थ्यांशी जोडला गेला होता. ऑनलाइन मान्यवरांमध्ये सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे पाच माध्यमिक विद्यालये, दोन इंग्रजी माध्यमाची माध्यमिक विद्यालये, एक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. शिक्षण संस्थेची स्थापना १९८४ मध्ये मुलींच्या शिक्षणाच्या सोयीसाठी झाली होती. या संस्थेच्या छोट्याशा रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. या संस्थेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी सर्वगुणसंपन्न निर्माण व्हावा. अशी अपेक्षा यावेळी थोरात यांनी व्यक्त केली.
त्यासाठी सर्व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, त्यासाठी वेळोवेळी घडणारे बदल शिक्षकांनी आत्मसात करावेत. सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले. आभार मानसिंग रुपनवर यांनी मानले.
२४ केडगाव
भैरवनाथ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सरस्वती पूजन करताना रमेश थोरात व मान्यवर.