शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

शिक्षकाने साकारली ‘बोलणारी पुस्तके’

By admin | Published: March 05, 2017 4:11 AM

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काळेवाडी परिसरातील मूगाव या छोट्याशा खेडेगावातील सचिन शेळके या तंत्रस्नेही शिक्षकाने ‘बोलणारी पुस्तके’ हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन

- अप्पासाहेब मेंगावडे,  राजेगाव

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काळेवाडी परिसरातील मूगाव या छोट्याशा खेडेगावातील सचिन शेळके या तंत्रस्नेही शिक्षकाने ‘बोलणारी पुस्तके’ हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना हसतखेळत शिक्षणासाठी हातभार लावला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे व शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या हस्ते शेळके यांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शंभूभक्त सेना महाराष्ट्र राज्य यांनीही त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे.या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमध्ये इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी सर्व विषयांतील घटकांवर व्हिडिओ तयार केले आहेत. ३ एमबीच्या अ‍ॅपवर व्हिडिओ पाहता येतात, तसेच डाऊनलोडही करता येतात. यामध्ये घटकाच्या आशयाला अनुसरून आॅॅफलाईन टेस्ट तसेच विषयानुसार ७१ मोबाईल अ‍ॅप आहेत. या अ‍ॅपमध्ये प्रत्येक पाठासाठी ‘क्यू आर कोड’सुद्धा आहेत. कोड डाऊनलोड करून पुस्तकाला चिकटवता येतील व गरजेनुसार क्यू आर ड्राऊड अ‍ॅपने स्कॅन केले, की मोबाईलवरच पाठ सुरू होईल.त्यामुळे पहिलीच्या पालकांना मुलांचा अभ्यास घरीसुद्धा घेण्यास अ‍ॅपची मदत होईल. मुलांना मोबाईल, टीव्हीचे जास्त आकर्षण असल्याने पालकांच्या मोबाईलमध्ये ती रममाण होतात, हा विचार करून घरी अभ्यास घेण्यासाठी हे अ‍ॅप तयार केले आहे.सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी दोन तासांपेक्षा कमी वेळ लागत असल्याने मुले रोजच सर्व पाठ्यपुस्तके अभ्यासू शकतात. अ‍ॅपवरून व्हिडिओ डाऊनलोड करून पालक पहिलीच्या मुलांचा घरी अभ्यास घेऊ शकतात. अ‍ॅपचा उपयोग राज्यातील पहिलीचे लाखो विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना होईल, तेही पाठ्यपुस्तके बदलेपर्यंत.शेळके यांनी लोकसहभागातून आपली शाळा दौंड तालुक्यातील पहिली टॅबलेट स्कूल केली आहे. शाळेने पहिल्या शिक्षणाच्या वारीत राज्यातील शाळांना कमी खर्चात डिजिटल शाळेविषयी मार्गदर्शन केले आहे. नुकतेच त्यांनी चार महिने अगोदर पहिलीच्या मुलांना शाळेत दाखल केले आहे. पुनर्वसनाच्या या शाळेत बचत बँक, माझा वाढदिवस, डिजिटल रचनावाद उपक्रम तसेच आॅगमेंटेड रिएलिटी शो अर्थात चित्रांना सजीव केले आहे. त्यांनी गुणवत्तावाढीसाठी बालस्नेही उपक्रम सुरू केले आहेत.अ‍ॅडमिन पॅनल, प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र यासारख्या शेकडो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून राज्यातील लाखो शिक्षकांपर्यंत शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य शेळके करीत आहेत. राज्य आयसीटी कोअर कमिटीचे ते सदस्य आहेत.शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, गटविकास अधिकारी संतोष हराळे, गटशिक्षणाधिकारी गौतम बेलखेडे, विस्तार अधिकारी गोरक्षनाथ हिंगणे, केंद्रप्रमुख शब्बीर शेख, तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व राज्य तंत्रस्नेही शिक्षक मित्रांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे ते सांगतात. मुले गुंतून राहतील अभ्यासात...मुलांचा अभ्यास ही पालकांसाठी मोठी चिंतेची बाब समजली जाते. त्यातून मोबाईल, टीव्ही या आकर्षणांपासून त्यांना दूर कसे ठेवायचे हे एक वेगळेच आव्हान डोळ््यांसमोर असते अशा परिस्थितीमध्ये या अ‍ॅपच्या माध्यमातून मुले आता घरबसल्या अभ्यास करू शकतील तसेच पालकांनाही त्यांना एका चांगल्या पद्धतीने गुंतवून ठेवता येणे शक्य होणार आहे.