या परिसरातील अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यामुळे शिक्षणासाठी मुलांना स्वतंत्र मोबाईल घेऊन देणे मुलांना शक्य होत नाही. त्यामुळे पालकांच्या परवानगीने आणि कोरोनाचे नियम पाळत मास्क व सॅनिटायजरचा वापर करीत शिक्षकांनी मुलांना एकत्र जमवून त्यांना ऑफलाइन शिक्षणाचे धडे देण्यात आले. गुरुवारी शिक्षकांनी कामठवाडी येथील मंदिराच्या आवारात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना बोलविण्यात आले होते. या वेळी ३७ पैकी ३५ मुले उपस्थित होती.
या उपक्रमात वाल्हे परिसरातील सर्व वाडीवस्तीतील मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रत्येक वाडीला वार ठरवून दिले आहेत. शिक्षकांचेही गट तयार करून प्रत्येक ठिकाणी वेगळे शिक्षक पाठवत असल्याची माहिती मुख्याध्यापक मोहन वाघमारे यांनी सांगितले. या उपक्रमांचे पालकांनी स्वागत केले आहे. घरोघरी जाऊन मुलांना शिकविण्याच्या या उपक्रमात शिक्षक राजेंद्र डोंगरे, प्रदीप जगताप, गीतांजली मोरे, वैशाली माने, प्रियंका कणेर आदी शिक्षकांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापक मोहन वाघमारे, पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार यांनी भेट दिली.