पुणो : महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचा:यांचा सेवाज्येष्ठता यादीत समावेश करून त्यांना महापालिकेच्या सेवकांप्रमाणो फायदे द्यावेत. तसेच, शिपाई, लेखनिक, आया, नर्सेस या कर्मचा:यांनादेखील महापालिकेच्या वेतनश्रेणीचे फायदे देण्यात यावेत, आदी मागण्यांसाठी शनिवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शिक्षकेतर कर्मचारी; तसेच कामगार संघटनांच्या वतीने ‘धरणो आंदोलन’ करण्यात आले.
पुणो महानगरपालिका मजदूर संघाच्या आंदोलनामध्ये कर्मचा:यांनी सहभाग घेतला होता. आंदोलनामध्ये मजदूर संघाचे जालिंदर कांबळे, दीपक कुलकर्णी, श्रीपाद नाईक, जयंत भांडवलकर, संजय जाधव, डी. वाय. शेख, अंकुश शिंदे, संतोष गोसावी, सतीश जगताप सहभागी झाले होते.
सॅनिटरी इन्स्पेक्टर पदावरील नियमबाह्य नेमणूका रद्द करण्यात याव्यात, रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करावे, याही मागण्या या वेळी कामगारांकडून करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)
4महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अनुकंपा तत्त्वावरील कर्मचारी काम करीत आहे. राज्य सरकारच्या वेतनाप्रमाणो काढलेले त्यांचे आज्ञापत्रक रद्द करून, ते महापालिकेच्या वेतनाप्रमाणो करण्यात यावे. शिपाई, आया, नर्सेस, लेखनिक आणि तांत्रिक संवर्गातील सेवकांना नेमणुकीच्या तारखेपासून महापालिकेच्या वेतनश्रेणीप्रमाणो सेवासुविधा देण्यात याव्यात. महापालिकेच्या आरोग्य विभागातील प्रयोगशाळेत काम करणा:या सेवकांना सेंट्रल आणि स्टेट मेडिकल कौन्सिलप्रमाणो पदनाम देऊन वेतन देण्यात यावे, या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या.