पुणे : गुणरत्न सदावर्ते (gunratan sadavarte ) यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये (pune police) ऑक्टोबर 2020 मध्ये एक गुन्हा दाखल आहे. छत्रपती संभाजी राजे(sambhajiraje) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दिली होती. त्यानुसार सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदावर्ते सध्या कोल्हापूरपोलिसांच्या (kolhapur police) ताब्यात आहेत. तेथील त्यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. त्यामुळे पुणे पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेणार का हे अवघ्या काही वेळात स्पष्ट होईल.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात राहणारे अमर रामचंद्र पवार (वय ३५ वर्षे) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. अमर पवार हे बांधकाम व्यावसायिक असून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहतात. सदावर्ते यांनी ७ ऑक्टोबर २०२० रोजी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा वंशजांचा एकेरी उल्लेख करुन सकल मराठा समाजाचा अपमान होईल व जाती-पाती मधे तेढ निर्माण होऊन दंगल भडकेल अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.