शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

अल्पवयिन मुलीची छेड; आई भावास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 4:05 AM

मंचर: शाळेत जाणाऱ्या अल्पवयिन मुलीची छेड काढणाऱ्यास आईने व भावाने जाब विचारला असता त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना आंबेगाव ...

मंचर: शाळेत जाणाऱ्या अल्पवयिन मुलीची छेड काढणाऱ्यास आईने व भावाने जाब विचारला असता त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे सोमवारी घडली. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर दत्तात्रय रागमहाले असे आरोपीचे नाव आहे. रागमहाले हा एका अल्पवयिन मुलीचा शाळेत जातांना पाठलाग करत होता. तसेच तिला त्रास देऊन रोज तिचा विनयभंग करत होता. रोजच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार मुलीने शाळेतील शिक्षकांना तसेच आई-वडील, भाऊ यांना सांगितला होता. त्यावेळी रागमहाले याला समज देण्यात आली. लॉकडाऊन मध्ये शाळा बंद असल्याने ही मुलगी गावातील क्लासला जात होती. त्यावेळीही किशोर रागमहाले हा नेहमी पाठलाग करून तीच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. रविवारी सकाळी ही मुलगी घरातून गावात भाजीपाला आणण्यासाठी निघाली होती. वेताळबुवा चौक येथून जात असताना किशोर रागमहाले हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवरून पाठलाग करत आला. तिला त्रास देत त्याने तिचा विनयभंग केला. मुलगी घाबरून पळत घरी गेली. त्यावेळीही रागमहाले मोटरसायकलवरून पाठलाग करत तिच्या घराजवळ येऊन थांबला. या मुलीने हा प्रकार घरात जाऊन सांगितला. तिच्या आई आणि भावाने रागमहाले यास विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याठिकाणी असलेले खोऱ्याचे दांडके घेऊन त्याने मुलीचा भाऊ याच्या डाव्या हातावर मारून दुखापत केली. तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी देऊन तो तिथून निघून गेला. याप्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलीने मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी किशोर दत्तात्रय रागमहाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.