शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

‘आत्मनिर्भर’साठी तांत्रिक व्यवसाय शिक्षणाची संधी; प्रवेश प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 12:40 PM

विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावरील इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, आॅटोमोबाईल टेक्नॉलॉजी या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल. 

ठळक मुद्देप्रवेश प्रक्रिया : पर्याय भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक 

पुणे : इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना तांत्रिक व्यवसाय शिक्षण घेऊन ‘आत्मनिर्भर’ होण्याची संधी आहे. शासकीय तांत्रिक विद्यालयांमधील व्होकेशनल अभ्यासक्रमांची (एमसीव्हीसी) प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरावरील इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, आॅटोमोबाईल टेक्नॉलॉजी या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल. ‘आत्मनिर्भर भारत’ अशी घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विविध तांत्रिक कौशल्य आत्मसात करून आत्मनिर्भर होण्याची संधी तरूणांना आहे. आगामी काळात कुशल मनुष्यबळाची जगात मोठी गरज भासणार आहे. हे कौशल्य देणारे अभ्यासक्रम म्हणजे दहावीनंतरचे ‘व्होकेशनल’ अभ्यासक्रम. याअंतर्गत टेक्निकल, कॉमर्स अँड ट्रेड, हॉस्पिटॅलिटी, फिशरी पॅरामेडिकल व कृषी यांसारख्या  विविध गटातील अभ्यासक्रम शिकता येतात. विद्यार्थिनींसाठीही  सर्व अभ्यासक्रम उपयुक्त आहेत. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे. मुख्य म्हणजे हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर आधारित असल्याने विद्यार्थी दोन वर्षात आधुनिक ज्ञान घेऊन कौशल्य आत्मसात करतात. प्रवेश घेताना ठराविक टक्क्यांची गरज नाही. अगदी पस्तीस टक्के गुण असणारा विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतो. तसेच १ किंवा २ विषयात नापास झालेले एटीकेटी असणारे विद्यार्थी काही अटींवर प्रवेश घेऊ शकतात.        परीक्षा उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत घेतली जाते म्हणजेच विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर बारावी व्होकेशनल उत्तीर्ण होतो. पुढे त्याच विषयात अभियांत्रिकी पदविका च्या दुसºया वर्षाला थेट प्रवेश मिळू शकतो. बी.व्होक. ,बी.एस्सी, बी.कॉम ,बी.ए व बी.सी.ए या पदवी अभ्यासक्रमांना ही  प्रवेश घेता येतो. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीचा व सवलतींचा लाभ घेता येतो. -------------अनुदानित व विनाअनुदानित अशा अनेक संस्थांमधून हे अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमांना पुणे, मुंबई शहरांकरिता केंद्रीय पद्धतीने प्रवेश घ्यावा लागतो. याबाबत अधिक माहिती  या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. तसेच एसएससी मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे . जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयात तसेच संस्थांमध्ये माहिती मिळू शकेल.- मंजुषा पागेशासकीय तांत्रिक विद्यालय,घोले रोड,पुणे-----------------याअंतर्गत असणारे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे -१. टेक्निकल ग्रुप- इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, आॅटोमोबाईल टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी२. कॉमर्स अँड ट्रेड - अकाउंटिंग अँड फायनान्स फायनान्शियल, आॅफिस असिस्टंट, लॉजिस्टिक अँड सप्लाय मॅनेजमेंट३. हॉस्पिटॅलिटी-  फुड प्रोडक्शन, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ४. अँग्रीकल्चर -हॉर्टिकल्चर, क्रॉप सायन्स अँड अँनिमल हसबंडरी, डेअरी टेक्नॉलॉजी५. पॅरामेडिकल- रेडिओलॉजी टेक्निशियन, मेडिकल लॅब टेक्निशियन, चाईल्ड अँड ओल्ड एज हेल्थकेअर ६. फिशरी - फिशरी  टेक्नॉलॉजी --------------

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थी