अवसरी : पुणे-नाशिक महामार्गावरील अवसरी पेठ घाटात चौपदरी रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याने या रस्त्यावरून वाहतूक चालू झाली आहे. या अवसरी घाटात जुन्या रस्त्यालगत महामार्ग पोलीस चौकी अनेक वर्षांपासून आहे. आता नवीन रस्ता चालू झाल्याने लहानमोठे अपघात झाल्यास पोलीस चौकीत जाता येत नाही. मोठा अपघात झाल्यास पोलिसांना समजत नाही. पोलीस चौकीची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. नवीन रस्त्यालगत पोलीस चौकीचे बांधकाम पूर्ण झाले असून, तांत्रिक अडचणीमुळे पोलीस चौकी चालू होऊ शकत नाही.महामार्ग पोलिसांची चाकण ते संगमनेर-बोटापर्यंतच्या वाहतुक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आहे.पुणे-नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू आहे. अवसरी पेठ घाटात चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक नवीन रस्त्याने चालू झाली आहे. तर, पोलीस चौकी रस्त्यालगत असल्याने जुन्या रस्त्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. वाहनाचा अपघात झाल्यास वाहनचालकांना जुन्या रस्त्यालगत असलेली चौकी दिसत नाही व महामार्ग पोलिसांना रात्रीच्या वेळी वाहानांचे अपघात झाल्याचे समजत नाही. मंचर, नारायणगाव, आळेफाटा महामार्गावर मोठा अपघात झाल्यास रुग्णांना तातडीने पुण्याला नेण्यासाठी वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. नवीन चौकी तातडीने चालू व्हावी, अशी मागणी अवसरी पेठ घाटातील अधिकारी, कर्मचारी करीत आहे.२ गुंठे जागा बक्षिसपत्र : प्रवाशांना मदतपुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी किंवा लहान-मोठा अपघात झाल्यास प्रवाशांना तातडीने मदत मिळावी, म्हणून अवसरी घाटात महामार्ग पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या पोलीस चौकीसाठी स्वर्गीय भरत भालचंद्र शिंदे पोलीसपाटील यांनी २ गुंठे जागा बक्षिसपत्र म्हणून दिली.
पोलीस चौकी सुरू होण्यास तांत्रिक अडचणी
By admin | Published: January 12, 2017 1:54 AM