तरुणाचे हृदय ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्यात आणले आणि हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रत्यारोपणानंतर आता महिलेची प्रकृती स्थिर असून, घरी जाण्याआधी काही दिवस त्यांना देखरेखी खाली ठेवण्यात येईल. प्रत्यारोपण टीममध्ये हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज, डॉ. राजेश कौशिश, डॉ. दीपक भौसार, प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ डॉ. शंतनू शास्त्री, डॉ. सुहास सोनावणे व डॉ. प्रीती अडाते, परफ्युझिनिस्ट प्रशांत धुमाळ, अमर जाधव, सम्राट बागल, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रिया पालीमकर, डॉ. मनोज भिसे, डॉ. जगजीत देशमुख आणि डॉ. अभिजित पळशीकर, प्रत्यारोपण समन्वयक डॉ. स्वाती निकम, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा महाज यांचा समावेश होता.
खासगी हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्रारअली दलाल म्हणाले, ‘आपण महामारीच्या काळात असताना या हृदय प्रत्यारोपणात सामील झालेली डॉक्टरांची टीम व झेडटीसीसी समन्वयक आरती गोखले व ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दात्याच्या कुटुंबीयांच्या संमतीमुळे एका रुग्णाला नवसंजीवनी मिळाली आहे.’