निनाद देशमुख
पुणे : भारतीय हवाई दलासाठी ८३ तेजस विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने बुधवारी मंजुरी दिली. राफेलपाठोपाठ हवाई दलात तेजस विमाने दाखल होणार असल्याने हवाई दलाच्या ताकदीत आणखी वाढ होणार आहे. आवाजाच्या दुप्पट वेगाने उडण्याची क्षमता ‘तेजस’मध्ये आहे. ३० वर्षांपासून विमानावर संशोधन सुरू होते. परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला होता. १९९३ मध्ये सरकारने या प्रकल्पासाठी २ हजार १८८ कोटी रुपये मंजूर केले होते.
तेजस हे चौथ्या पिढीचे विमान असले तरी या विमानाच्या निर्मितीमुळे आपल्याला पुढच्या पिढीची विमाने बनवायला मदत होईल. कारण भारत अवकाश व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात पुढे आहे. या तंत्रज्ञानाची सांगड घालून ही विमाने बनविता येतील.- एअर चिफ मार्शल पी. व्ही. नाईक, माजी हवाईदल प्रमुख
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सज्जतेने परिपूर्णn तेजस हे मिग २१ विमानांपेक्षाही आधुनिक असून हे चौथ्या पिढीचे विमान आहे. n इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ॲरे (एईएसए), दृष्टीपलीकडील पल्ल्याचे क्षेपणास्त्र (बीव्हीआर), इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रज्ञानयुक्त तसेच इस्राईल निर्मित आधुनिक रडार, हवेत इंधन भरण्याची सुविधाn ८३ विमाने असणार मार्क १ ए प्रकारची, भविष्यातील मार्क २ विमानांवरही संशोधन सुरू.