शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

तेजस, सुब्बी सिंहाची डरकाळी

By admin | Published: April 10, 2017 1:48 AM

सकाळची वेळ व मागील जवळ जवळ चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी जेव्हा तेजस व सुब्बी ही सिंहाची जोडी

धनकवडी : सकाळची वेळ व मागील जवळ जवळ चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी जेव्हा तेजस व सुब्बी ही सिंहाची जोडी, आपल्या रात्रीच्या आवास पिंजऱ्यातून बाहेर आली आणि पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतून शिट्टी व टाळ्यांनी त्या जोडीचे स्वागत केले़ ही जंगलाच्या राजा राणीची जोडी बाहेर येताच अनेकांचे कॅमेरा फोटो काढण्यासाठी सरसावले होते, यात बाल बच्चे कंपनीला उत्सुकता होती, अनेक पालक देखील यात सहभागी झाले होते़ इतकी माणसांची गर्दी पाहून जंगलाचा राजा असल्याने घाबरला नाही किंवा न बावरता प्रेक्षकांच्या समोर हजर झाले व  पाहिजे त्या पोज मध्ये फोटो काढण्यासाठी उभे राहिले होते़ अंदाजे चार ते साडेचार फूट उंचीचे धस्ट पुष्ट असलेला त्याचबरोबर मानेवर  आयाळ असलेला तेजस राजा सारखा शोभत होता़ त्याने बाहेर आल्यानंतर फोडलेली डरकाळी परिसरात गुंजली़ कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात तेजस आणि सुब्बी ही आशियाई सिंहाची जोडी रविवारी प्रथमच नागरिकांना पाहण्यासाठी खुल्या खंदकात आणण्यात आली़ तिला पाहण्यासाठी प्राणीसंग्रहालयात मोठी गर्दी झाली होती़ तेजस आणि सुब्बी साधारणपणे साडे सहा वर्षांच्या या जोडीस २५ डिसेंबर २०१६ ला गुजराजमधील जुनागढच्या शक्करबाग प्राणी संग्रहालयातून आणण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले होते. वातावरणाशी अनुकुल झाल्यानंतर त्यांना पिंजऱ्यात पर्यटकांच्या भेटीसाठी ठेवण्यात येणार होते. ३ आठवड्यानंतर हे प्रयत्न यशस्वी झाले. तेजस व सुब्बी या जोडीला सध्या तात्पुरत्या स्वरूपात पांढऱ्या वाघाच्या खंदकात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या साठीच्या खंदकाची व्यवस्था झाल्यानंतर येथून त्यांना हलविण्यात येईल. (प्रतिनिधी)प्राणिसंग्रहालयामध्ये नूतनीकरण : अन्य प्राणीही येणार?प्राणिसंग्रहालयामध्ये नूतनीकरण व मास्टर प्लॅन भाग १ नुसार ही जोडी येथे आणण्यात आली असून २ वर्षांपूर्वी कैफ या पांढऱ्या वाघास येथे आणले होते.  पुढील काळात जिराफासह अन्य प्राणीही पहावयास मिळणार असून या बाबतचा प्रस्ताव सेंटर झू अ‍ॅथोरिटीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे, अशी माहिती राजकुमार जाधव यांनी दिली.  आशियाई सिंह हे राज्यातील केवळ याच प्राणीसंग्रहालयात असल्याने या प्राणी संग्रहालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. बोरिवलीच्या संजय गांधी प्राणी संग्रहालयात हायब्रीड प्रकारातील सिंह आहेत. केदार कासार या उद्योजकाने या जोडीला एक वर्षासाठी दत्तक घेतले असून चार लाख रुपयाचा धनादेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, उपसंचालक नवनाथ निघोट, दीपक धुमाळ, मनोज जाधव, कौशिक काशीकर, श्यामराव खुडे, दत्ता चांदणे यांसह नागपूर पशूवैद्यकिय महाविद्यालयाचे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.स्वागत वनराजाचे : कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात रविवारी वनराज ‘तेजस’ व ‘सुब्बी’ या जोडीने पुणेकरांना प्रथमच दर्शन दिले. त्यांच्या स्वागतास चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. तेजसच्या गर्जनेने आसमंत हादरून गेला.