शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

तेजस्विनी बसला रविवारी सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 2:13 PM

सुट्टीच्या दिवशी गाड्यांना गर्दी कमी असल्याने बहुतेक महिला इतर बसेसने प्रवास करतात. तेजस्विनी बसेसची वाट पाहत नाहीत. त्यामुळे या बसेसला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पीएमपीला आर्थिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देसुट्टीच्या दिवशी तेजस्विनी बसेसला महिलांचा प्रतिसाद तुलनेने खुप कमीया गाड्या आवश्यकतेनुसार सामान्य बस म्हणून मार्गावर सोडल्या जाणार मे महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार

पुणे : खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बससेवेला दर रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. रविवारी महिला प्रवाशांची संख्या खुप कमी असल्याने तेजस्विनी कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या रविवारपासून ही सेवा दर रविवारी बंद ठेवली जाणार आहे.बसने प्रवास करणाऱ्या महिलांची वाढती संख्या पाहून जागतिक महिला दिनापासून खास महिलांसाठी ‘तेजस्विनी’ ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. नवीन मिडी बसच्या माध्यमातून एकुण ८ मार्गांवर ३० बसेसमार्फत २१८ फेऱ्यांद्वारे ही सेवा दिली जात आहे. यापूर्वी केवळ दोनच मार्गांवर ही सेवा सुरू होती. तेजस्विनी सेवा सुरू झाल्यानंतर महिलांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. बहुतेक मार्गांवर सकाळी व सायंकाळी या बसेस असल्याने महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेजस्विनीने प्रवास करणाऱ्या बहुतेक महिला नोकरदार किंवा विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे सुट्टीचा दिवस वगळता या गाड्यांना गर्दी असते. दि. ८ मार्च ते ७ एप्रिल या महिनाभरात सुमारे २ लाख ३ हजार महिला प्रवाशांना विशेष बससेवेतून प्रवास केला आहे. रविवारी शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालये तसेच अनेक खासगी कार्यालयांना सुट्टी असल्याने सर्वच बसेसचा कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे रविवारी पीएमपीकडून तुलनेने कमी बस मार्गावर सोडल्या जातात. सुट्टीच्या दिवशी बस मोकळ्या धावत असल्याने पीएमपीला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तेजस्विनी बसेसचीही हीच स्थिती आहे. दर रविवारी या बसेस महिला प्रवाशांअभावी रिकाम्या धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुट्टीच्या दिवशी गाड्यांना गर्दी कमी असल्याने बहुतेक महिला इतर बसेसने प्रवास करतात. तेजस्विनी बसेसची वाट पाहत नाहीत. त्यामुळे या बसेसला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पीएमपीला आर्थिक नुकसान होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने दर रविवारी तेजस्विनी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आवश्यकतेनुसार सामान्य बस म्हणून मार्गावर सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे महिलांना दर रविवारी सामान्य बसनेच प्रवास करावा लागणार आहे.-----------सुट्टीच्या दिवशी तेजस्विनी बसेसला महिलांचा प्रतिसाद तुलनेने खुप कमी मिळतो. त्यामुळे दर रविवारी ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. तेजस्विनीच्या सर्व बस बंद ठेवल्या जातील. - दत्तात्रय माने, वाहतुक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलWomenमहिला