पुणे : पश्चिमी वाऱ्याच्या झंजावाताची साखळी खंडीत होण्याच्या शक्यतेमुळे ६ महिने संपूर्ण उत्तर भारतात पाऊस, तीव्र, हिमवृष्टी व थंडीचा कालावधी आता संपत आहे. निसर्ग कालचक्राप्रमाणे आता शुक्रवारी (दि.१५) महाराष्ट्रातही थंडी कमी होऊन कमाल व किमान अशान दोन्हीही तापमानात सरासरीपेक्षा २ डिग्री सेल्सिअस ग्रेडने वाढ होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
आजपासून (दि.१४) चार दिवसानंतर विदर्भातील केवळ अमरावती, नागपूर, गोंदिया व गडचिरोली अश्या ४ जिल्ह्यात दि.१६ ते १९ मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहील. अगदीच तुरळक ठिकाणी नकळत किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. तेंव्हा उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील ३२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाबरू नये. तेथे वातावरण कोरडेच राहील, असा अंदाज खुळे यांनी दिला आहे.
अवकाळी पाऊस व गारपीटीच्या हंगामाचा कालावधी अजूनही संपलेला नाही. परंतु खंडीत होत जाणाऱ्या प. झंजावाताच्या साखळ्या अन् एल- निनोचे वर्ष व मार्चच्या मासिक सरासरीइतकी किंवा मध्यम पर्जन्याची शक्यता, ह्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता नाही, असेच वाटत असल्याचे खुळे म्हणाले.