मांजरेवाडी धर्म येथे गेले कित्येक वर्षे स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत होती. जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या निधीतून नुकतेच स्मशानभूमीचे काम पूर्णत्वास गेले आहे. ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबली आहे. तसेच भीमा नदीकाठी शंकर महादेवाचे मंदिर असावे, यासाठी ग्रामस्थांनी बैठक घेऊन मंदिर उभारण्याचे ठरविण्यात आले. ग्रामस्थ लोकवर्गणीतून मंदिर बांधणार आहे. या मंदिराचे भूमिपूजन बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या वेळी धर्मनाथ मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्टीने बांधलेल्या पत्रा शेड लोकर्पण सोहळा पार पडला.
या वेळी मांजरेवाडीचे माजी सरपंच भगवान मांजरे, किसन मांजरे गुरुजी, उपसरपंच गणेश मांजरे, सुमन मांजरे, जयसिंग मांजरे, योगेश मांजरे, सत्यवान मांजरे, कैलास मांजरे, ईश्वर मांजरे, विठ्ठल मांजरे, गणेश कातोरे, अक्षय मांजरे, बबनराव मांजरे, दत्तात्रय मांजरे, बबन मैराळे, अरविंद मांजरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.