सईद शेख (वय १९, रा. पुणे) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे, तर शबाना भेळमे (वय ४०), नबी भेळमे (वय ४५), कसक भेळमे (वय १६), पैगंबर भेळमे (वय १३, सर्व राहणार भवानी पेठ, कासेवाडी, पुणे), तफिसा शेख, समीरा शेख, महेक शेख (सर्व राहणार अप्पर सरगम चाळ, पुणे), वाहनचालक अमीन मुजावर (वय २३) अशीच जखमींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ घाटात रविवारी पहाटे एक ट्रक (एमएच ५०, एन ३१९१) हा डिझेल संपल्याने बंद पडला होता. या वेळी पुणे बाजूकडून सोलापूरकडे अमीन मुजावर हे आपल्या ताब्यातील टेम्पो (एमएच १२, एसएक्स २४४०) घेऊन लग्नसमारंभासाठी सोलापूरला निघाले होते. त्या वेळी टेम्पोत नऊ जण होते. हा टेम्पो कुरकुंभ घाटात आला असता मुजावर यांना बंड पडलेला ट्रक न दिसल्याने टेम्पोने ट्रकला पाठीमागून धडक दिली. यात सईद शेखचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सुधीर काळे, घनश्याम चव्हाण ,हनुमंत खटके, होमगार्ड निखिल अवचट, मधुकर मस्के, अनिकेत मस्के, बाळासाहेब चोरमले, दादाराम बाबर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
१६ पाटस
अपघातग्रस्त टेम्पो