शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

टेम्पो उचलतो दिवसात फक्त २१ दुचाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 5:28 AM

वाहतूक विभागाची माहिती : वाहनसंख्या नोंदीमध्ये घोळाचा संशय

पुणे : शहरातील प्रमुख रस्त्यांवर नो पार्किंगमधील वाहने उचलण्यासाठी आलेला टेम्पो खचाखच भरलेला दिसतो. त्यामुळे दररोज शेकडोवाहनचालकांवर नो पार्किंगची कारवाई होत असल्याचासमज पुणेकरांचा होईल. नो पार्किंगमधील वाहने उचलण्यासाठी हे टेम्पो दिवसभर खपत असले, तरी पोलिसांच्या वाहतूक विभागाला त्यांच्या कामाचे वावडे असल्याचे नोंदींवरून दिसते. वाहतूक विभागाच्या नोंदीनुसार एक टेम्पो दररोज सरासरी फक्त २१ वाहने उचलत आहे. वाहनसंख्या, वाहतूककोंडी आणि पार्किंगची दुरवस्था शहरातील एक प्रमुख समस्या झाली आहे. लक्ष्मी रस्ता, जंगली महाराजरस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, शहर मध्यवस्तीतील पेठा आणि विविध ठिकाणी बेशिस्तपणे लावलेल्या दुचाकींवर कारवाई करण्यासाठी ५ टेम्पो कार्यरत आहेत. फरासखाना, विश्रामबाग, डेक्कन, कोथरूड, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, सांगवी आणि हडपसर या विभागांत जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत प्रत्येक महिन्यात कारवाई झाल्याचे दिसून येत आहे.बेशिस्तपणे वाहने लावून वाहतुकीला अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी निळे टेम्पो फारच तत्पर असल्याचे पाहायला मिळते. या कारवाईबाबत माहिती अधिकार अन्वये वाहतूक विभागाकडे विचारणा केली असता, वाहने उचलणाºयांची कामगिरी अगदीच खराब असल्याचे दिसून आले आहे. नोकरदारांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, त्यांचा की रिझल्ट एरिया (केआरए) अगदी खराब असल्याचे वाहतूक विभागाचे म्हणणे आहे.पावत्यांच्या प्रती नाहीत उपलब्ध : टोइंग डायरीत नोंद नाही1 गेल्या वर्षभरात ३७ हजार ७३७ वाहने उचलल्याची नोंद वाहतूक विभागाकडे करण्यात आली आहे. त्यातून ७० लाख ७१ हजार ३३५ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यानुसार नो पार्किंगमधील सरासरी १०३ वाहने प्रतिदिन उचलली जातात. म्हणजेच एक टेम्पो दररोज २१ वाहने उचलतो.2वाहतूक विभागाच्या नोंदीनुसार गेल्या वर्षी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व जूनमध्ये एकही कारवाई झालेली नाही. शिवाजीनगर, लष्करमधे ५ महिने, समर्थ २ महिने कारवाई झाली. तर, वारज्यात वर्षभरात कारवाईच झालेली नाही. स्वारगेट, सहकारनगर, विश्रांतवाडी आणि दत्तवाडीत वर्षातील ३ महिनेच कारवाई करण्यात आली.3भारती विद्यापीठ ७ महिने, हिंजवडीत २, पिंपरी ४, भोसरी १, चिंचवड ५, खडकी २, येरवड्यात वर्षातील ८ महिने कारवाई झाली. कोंढव्यात जानेवारी २०१७ वगळता एकाही कारवाईची नोंद नाही.माहिती अधिकारात नागरिकांना वाहन उचलल्यानंतर देण्यात आलेल्या पावत्यांच्या प्रतीची माहिती मागण्यात आली होती. ती उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे.तसेच, वाहन उचलल्यानंतर टोइंग डायरीमध्ये वाहनाची नोंद होते. त्याचीदेखील माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.ासेच, वाहन उचलल्यापोटी आकारण्यात येणाºया ५० रुपये शुल्काव्यतिरिक्त जास्त पैसे मागितल्या प्रकरणी किती जणांवर कारवाई करण्यात आली, या प्रश्नावर याबाबत एकही तक्रार दाखल झाली नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे.या प्रकरणी माहिती अधिकारात पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यात एक टेम्पो दिवसाला फक्त २१ वाहने उचलत असल्याच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रत्येक टेम्पोवर चार व्यक्ती काम करीत असतात. त्यांचे किमान वेतन कायद्यानुसार प्रतिदिन ४०० रुपयांप्रमाणे धरल्यास ते १,६०० रुपये प्रतिटेम्पो होते.चालकाचे ६०० रुपये वेतन. म्हणजे एका टेम्पोचा दिवसाचा खर्च २,२०० रुपये होतो. नियमाप्रमाणे एका दुचाकीमागे ५० रुपये संबंधितांना मिळतात. म्हणजेच १ हजार ५० रुपये मिळवून संबंधित व्यक्ती २,२०० रुपये खर्च करीत आहे. या संशयास्पद व्यवहाराची चौकशी करावी; अन्यथा त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे त्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणे