शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दहा दिवसांत पोलिसांना शरण जा ; सर्वोच्च न्यायालयाचा मानकरांना आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 2:11 PM

जितेंद्र जगताप यांनी २ जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जगताप यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हंटले होते.

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळलातीन खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता

पुणे : माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने देखील फेटाळला आहे. तसेच पुढील १० दिवसांत त्यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.    सलग तीन उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनावर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शवल्याने मानकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मानकर यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यास सुरुवातीला न्यायमूर्ती साधना जाधव यांनी असमर्थता दर्शवल्याने त्यांच्याकडून अर्ज दुसºया न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार १५ जून रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या न्यायालयात अर्ज करण्याला होता. मात्र, त्यांच्या खंडपीठाने देखील याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखविली होती. त्यानंतर मानकर यांनी तिसºया खंडपीठापुढे याचिका सादर केली होती. परंतु, त्याही खंडपीठाने सुनावणीस घेण्यास नकार दिला होता.      मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्याजितेंद्र जगताप यांनी २ जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जगताप यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हंटले होते. त्यामुळे पोलिसांनी जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विनोद रमेश भोळे (वय ३४, रा़ जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०,रा़ जयभवानी नगर, कोथरुड), अमित उत्तम तनपुरे (वय २८, रा़ मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा़  शांतीनगर येरवडा), कुख्यात गुंड नाना कुदळे (रा़  केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक करण्यात आली होती. तर मानकर आणि कर्नाटकी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातून अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून मानकर यांनी सर्वप्रथम शिवाजीनगर येथील न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर मानकर यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र तीन खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखविली होती.  

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिस