पाईट केंद्रात २१७४, तर करंजविहीरे केंद्रावर २५८५ लोकांना लस देण्यात आली आहे. तसेच या लसीकरणामध्ये पिंपरी बुद्रुक ३४७, संतोषनगर ३१९,गोनवडी - पिंपरी खुर्द २४६,रोहकल १५०,कोहिंडे बुद्रुक २६०,तळवडे ११२ किवळे २८१,चांदूस १५६,कोरेगाव बुद्रुक १८०,आसखेड बुद्रुक ९९,कुरकुंडी ६६४,कोये १४३,धामणे ७७,कोरेगाव खुर्द २३२,शेलु २१०,वराळे १४५,भांबोली १०८,सावरदरी १२७,शिंदे ३२७,वासुली १२०,आंबेठाण ४९५,बोरदरा ९५ बिरदवडी २०५ असे दहा हजार ४५ वर्षापुढील लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
या संकटाच्या काळामध्ये सुरक्षित होण्यासाठी लस हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. यासाठी सर्व नागरिकांनी त्वरित लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी केले आहे.
२५ आंबेठाण
आंबेठाण येथे लसीकरण करताना डॉक्टर व आरोग्य सेवक.