चाकण - अपहरण करून बाललैंगिक अत्याचार व बलात्कार प्रकरणामध्ये चाकण येथील १९ वर्षीय तरुणास १० वर्षांची शिक्षा आज ठोठावण्यात आली आहे. खेड सेशन्स कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. सलगर यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. ज्ञानेश्वर रंगराव भालेराव ( वय १९ वर्ष, रा. चाकण ता. खेड जि. पुणे, मुळगाव ब्राह्मण शेवगे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, १२ ऑक्टोबर २०१५ रोजी रात्री ९ ते १४ ऑक्टोबर २०१५ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान चाकण, मंचर व जळगाव जिल्ह्यातील निमगाव शिवार या ठिकाणी आरोपीने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. याबाबत चाकण पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.५३९/२०१५ नोंद आहे.या गुन्ह्यात आरोपीला भा.दं.वि.कलम ३६३ अन्वये ५ वर्षं शिक्षा व १००० रुपये दंड, भा. दं. वि. ३७६ अन्वये १० वर्षं शिक्षा व १००० रुपये दंड, पोक्सो कायदा कलम ४ अन्वये ७ वर्ष व १००० रुपये दंड, पोक्सो कायदा कलम ६ अन्वये १० वर्ष कलम ८ अन्वये ए वर्ष व ५०० रुपये दंड आणि कलम १० अन्वये ५ वर्ष व ५०० रुपये दंड अशी एकत्रित दहा वर्षे शिक्षा माननीय सेशन्स जज्ज ए. यस. सलगर सो. राजगुरुनगर खेड यांनी ठोठावली. या गुन्ह्याचा तपास मंचर व जळगाव येथे जाऊन केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुहास ठोंबरे व रायटर पोलीस कॉन्स्टेबल पोखरकर यांनी तपास करून कोर्ट अंमलदार राजेंद्र सोनवणे, सरकारी वकील गिरीश कोबल व मकरंद औरंगाबादकर यांनी कामकाज पहिले.
अपहरण, बाललैंगिक अत्याचार व बलात्कारप्रकरणी चाकण येथील युवकास दहा वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 10:18 PM