बारामती: बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात तिसरा कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. ३ मे रोजी हा रुग्ण उपचारासाठी त्याच्या मुंबई येथीलनातीकडे गेला आहे.४ मे रोजी केलेल्या तपासणी मध्ये त्याचा अहवाल 'पोसिटिव्ह ' आल्याचे स्पष्ट झाले आहे .तालुक्यातील माळेगाव येथेसापडलेला दुसरा रुग् ण आहे. ग्रामीण भागातील तिसरा तर, बारामतीपरीसरातील हा दहावा रुग्ण आहे अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. दहावा रुग्ण सापडल्याने अहवाल बारामतीकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज सापडलेला रुग्ण माळेगाव येथील आहे. ती व्यक्ती व्यवसायाने वायरमन असून पुणे येथे नोकरीस आहे. दिनांक ८ मे रोजी माळेगाव बुद्रुक येथे आपल्या राहत्या घरी ते आले होते. त्यांचा एक सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ' हाय रिस्क' कॉन्टॅक्ट तपासणीमध्ये त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माळेगाव बुद्रुकची महसूली गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व लॉकडॉऊन दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये,असे आवाहन प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे.
शहरात श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरसह तालुक्यात माळेगाव,कटफळ येथे आजपर्यंत एकुण नऊ सापडले आहेत.त्यापैकी भाजीविकेता असणाऱ्या रुग्णासह माळेगाव येथील रुग्णाचा मृत्यू झाला आहे.तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.शेवटच्या रुग्णाला ३० एप्रिल रोजी ' डिस्चार्ज ' देण्यात आला होता. बारामती कोरोनामुक्त झाल्याच्या आनंदात बारामतीकर होते, हा आनंद अल्पावधीचा ठरला आहे.
दहावा रुग्ण सापडल्याने बारामतीची ऑरेंज झोनच्या दिशेने वाटचाल खडतर होणार आहे.नुकतेच शहरातील दुकाने रोटेशन पध्दतीने सुरु करण्यात आली आहेत. त्यातच हा रुग्ण सापडल्याने प्रशासन आणि नागरीकांची डोकेदुखी वाढली.