लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य शिक्षण कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे इयत्ता दहावीच्या पूर्व व्यावसायिक प्रात्यक्षिक परीक्षेचे शुल्क रुपये ४०० वरून १०० रुपये करण्यात आले आहे, असा आदेश शासन स्तरावर घेण्यात आलेल्या बैठकीत जारी करण्यात आला. याचा लाभ महाराष्ट्रातील ५८ हजार पूर्व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.महाराष्ट्र राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शासन एकीकडे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या घोषणा करीत आहे. तर दुसरीकडे, इयत्ता १०वीच्या पूर्व व्यावसायिक परीक्षेचे शुल्क २० रुपये असताना ४०० रुपये आकारण्याचा आदेश देते. ही वागणूक दुटप्पीपणाची असून सदर वाढीव शुल्काचे आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणेच परीक्षा शुल्क आकारले जावेत, अशी विनंती महाराष्ट्र राज्य अशासकीय तांत्रिक माध्यमिक शिक्षण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष एन. ए. जमादार यांनी केली होती. या आशयाचे पत्र जमादार यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या अध्यक्ष आश्विनी काळे, सहसचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई, डॉ. सुर्वणा खरात, सचिव, कौशल्यविकास व उद्योजगता विभाग मंत्रालय, मुबंई, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण महापालिका मार्ग, मुबंई, संभाजी पाटील निलंगेकर मंत्री, कौशल्य विभाग यांना दिले होते.पालकांना मोठा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार होते.
दहावी प्रात्यक्षिक परीक्षेचे शुल्क आता १०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 2:22 AM