शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

पुण्यातील भयानक घटना! अनैतिक संबंधात अडथळा; पोटच्या लेकाचा डोक्यात दगड घालून खून, आईचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 1:34 PM

आई आणि तिच्या प्रियकराचे मुलाशी कडाक्याचे भांडण झाले होते, यावेळी दोघांनी मारहाण करत मुलाच्या डोक्यात दगड घातला

किरण शिंदे

पुणे: पुण्यातील लोणीकंद परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या पोराला आईनेच ठार मारलं. डोक्यात दगड घालून आई आणि तिच्या प्रियकरांनी तीस वर्षीय मुलाचा खून केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आईला बेड्या ठोकल्या तर प्रियकर पसार झाला आहे.

अनिल लालसिंग ठाकूर (वय ३०) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिलची आई सुमित्रा लालसिंग ठाकूर (वय ५५, रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा, नगर रस्ता) हिला अटक केली. तर, सुमित्राचा प्रियकर प्रफुल्ल पुंडलिक ताथोड (वय ३४, रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा, नगर रस्ता) हा फरार झाला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिलचा भाऊ सुनील ठाकूर (वय ३२) याने याबाबत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित्रा आणि तिची मुले उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. पेरणे फाटा परिसरातील वाघमारे वस्तीत ते राहत होते. याच परिसरात राहणारा आरोपी प्रफुल्ल सोबत सुमित्राचे अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधाची कुणकुण अनिलला लागली होती. त्यामुळे त्यांच्यात वादावादी होत होती. तर, कडाक्याचे भांडणही झाले होते.

दरम्यान बुधवारी मध्यरात्री ही त्यांच्यात भांडण झाले. आणि याच भांडणातून सुमित्रा आणि प्रफुल यांनी अनिल याला शिवीगाळ करत मारहाण केली. तर त्याच्या डोक्यात दगडही घातला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला तातडीने  रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी धाव घेतली. आई सुमित्रा हिला अटक केली तर प्रियकर प्रफुल्ल हा पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट