शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

वाळूमाफियांची तहसीलदारांच्या हातावर तुरी, ट्रकमालक-चालकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:25 AM

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे तहसीलदार रणजित भोसले यांनी चार वाळूच्या वाहनांवर कारवाई केली.

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे तहसीलदार रणजित भोसले यांनी चार वाळूच्या वाहनांवर कारवाई केली. मात्र, माफियांनी तहसीलदार, मंडलाधिका-यांच्या हातावर तुरी देऊन चारही ट्रक रात्रीतून गायब केले. विशेष म्हणजे एका ट्रकच्या चारही चाकांची हवा सोडून देऊनही ट्रक फरार झाल्याने वाळू माफियांना अभय कोणाचे ? याची चर्चा रंगू लागल्यावर मंडलाधिका-यांनी ट्रकमालक-चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील पोलीस चौकीतून पाच वाळूचे ट्रक गायब होण्याच्या घटना ताजी आहेत. तसेच, शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार जितेंद्र केशव मांडगे यांच्यावर वाळू व्यावसायिकांकडून लाच मागितल्याच्या कारणावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केल्याचा प्रकारही नुकताच घडला आहे. यानंतर तालुक्यातील बड्या नेत्याच्या नातेवाइकांचे पकडलेले ट्रक तळेगाव येथील शासकीय गोदामातून गायब झाल्याच्या प्रकारामुळे महसूल व पोलीस प्रशासनाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.कोरेगाव भीमा येथे महसूल विभागाच्या मंडल अधिकारी व कामगार तलाठ्यांची बैठक तहसीलदार रणजित भोसले यांच्या उपस्थितीत मंडल कार्यालय कोरेगाव भीमा येथे सायंकाळी पार पडली. या बैठकीनंतर तहसीलदार रणजित भोसले यांनी मंडल अधिकारी ज्ञानोबा विश्वांबर कावळे, उद्धव नामदेव फुंदे, कामगार तलाठी सुहास अनंत नांगरे, ज्ञानदेव किसन वाळके, डी. एस. भराटे व कोतवाल संतोष शिंदे यांच्या पथकासह कोरेगाव भीमा येथे पुणे-नगर महामार्गावर रात्री दहाच्या सुमारास अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणाºया वाळूच्या ट्रकवर कारवाई करण्यासाठी थांबल्यानंतर ठराविक अंतराने एमएच १२-डीजी २६१७, एमएच १२-सीएच ५३३४, एमएच १२-एचडी ४८५४, एमएच १२-एमव्ही २६३३ हे वाळूचे ट्रक पकडले. या वाहनांमध्ये प्रत्येकी चार ब्र्रास वाळू असल्याने ही वाहने तळेगाव ढमढेरे येथील शासकीय गोदामामध्ये नेण्याच्या सूचना तहसीलदार रणजित भोसले यांनी भरारी पथकाला दिल्या. मात्र, एका ट्रकच्या (एमएच १२-सीएच ५३३४) चालकाने ट्रकचा स्ट्रार्टरच काढून नेल्याने ट्रक तळेगाव ढमढेरे येथे नेणे शक्य नव्हते. दरम्यान, उर्वरित ३ ट्रक तळेगाव गोदामामध्ये नेत असताना महसूलच्या कर्मचाºयांना दमदाटी करून शिवीगाळ करीत गाडी थांबवून गाडीच्या खाली उतरवले. त्यानंतर महसूलचे उद्धव फुंदे, ज्ञानदेव वाळके, सुहास नांगरे, डी. एस. भराटे व फिर्यादी कावळे यांनाही ट्रकमधून खाली उतरवले. त्यानंतर ट्रकचालक ट्रकमालकांशी संगनमत करून तिन्ही ट्रक घेऊन तेथून फरार झाले.एका ट्रकच्या चारही चाकांची हवा सोडून देण्यात आली व ट्रक डिंग्रजवाडी फाटा येथेच सोडून देण्यात आला. पोलीस व महसूलचे कर्मचारी त्या ठिकाणाहून जाताच ट्रकचालकांनी सदर ट्रकमध्ये पुन्हा हवा भरून ते पळवून नेण्यात यशस्वी झाले.या चारही ट्रकचालक व ट्रकचे मालक एन. के. म्हस्के, गणेश वेताळ, दादा पाटील घावटे, गणेश पवार यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणून दमदाटी व शिवीगाळ करून ट्रक व ट्रकमधील चार ब्रास वाळू चोरून नेल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.>बड्या नेत्याच्या नातेवाइकांना अभय का?शिरूर तालुक्यातील बड्या नेत्याच्या नातेवाइकाचे वाळूवाहतूक करणारे ट्रक मोठ्या प्रमावर आहेत. या बेकायदा वाळूवाहतूक करणाºया ट्रकवर कारवाई करण्यात महसूल विभागामार्फत सूट दिली जात असल्याच्या तक्रारी होत असल्याने या बड्या नेत्याच्या नातेवाइकाला प्रशासन अभय का देत आहे? असा सवाल उपस्थित होतो.>हवा भरणाºयावर कारवाईहोणार का?कोरेगाव भीमा येथे महसूल विभागाने ट्रक पकडल्यानंतर ट्रकचालक ट्रकचा स्टार्टरच काढून पळून गेला. ट्रकची चारही चाकांची हाव सोडून देऊनही वाळू व्यावसायिक पुन्हा हवा भरून ट्रक पळवून नेण्यात यशस्वी झाल्याने या ट्रकच्या चाकात हवा भरणाºयावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Puneपुणे