भोर व वाई तालुक्याला जोडला जाणाऱ्या आंबाडखिंड घाटातील डोंगरमाथा आहे. या डोंगरमाथ्यावरील दऱ्यांमध्ये जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. दर वर्षी या जंगलात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बिबट्या किंवा बिबट्या सदृश प्राण्यांचा वावर वाढतो. याचा परिणाम होऊन नेरे परिसरातील आंबाडे बालवडी, वरवडी, पाले, पलसोशी, निळकंठ, गोकवडी या गावांच्या डोंगराशेजारील खासगी रानात चरावयास सोडलेल्या शेतकऱ्यांच्या गाई, बैल, म्हैैस, शेळी या पाळीव प्राण्यांंवर हा बिबट्यासदृशसारखा प्राणी हल्ला करीत असतो. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या बिबट्याचा सदृश्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
दर वर्षी महाबळेश्वर व पाचगणी येथील जंगलातून अन्नपाण्यासाठी शेजारील डोंगर रांगांमधील जंगलात बिबट्या सदृश प्राणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येत असतात. हे प्राणी अन्न पाण्याच्या शोधात असताना डोंगररांगा शेजारील शेतकऱ्यांच्या खासगी रानात चरावयास सोडलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात. याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित शेतकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क करण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांनी केले आहे.