शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवाद्याला चाकणमधून अटक, बिहार एटीएसची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 6:35 PM

चाकण एमआयडीसीतील वासुली फाटा ( ता. खेड ) येथून शरियत मंडल ( पूर्ण नाव नाही ) या पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय दहशतवादी तरुणास अटक करण्यात आली आहे.

चाकण : पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्यांच्या साथीदारास पुण्यातील चाकण जवळील खालूंब्रे ( ता.खेड ) येथून बिहार एटीएसने अटक केली आहे. शरियत अन्वरहूलहक मंडल ( रा. बाजीपूर, ता. गंजा, जि. नादिया, प. बंगाल ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शरियत हा बांधकाम मजूर म्हणून काम करीत होता. बिहारमधील पाटणा जंक्शन येथे एटीएसने खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघा बांगलादेशींना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये शरियतचे नाव पुढे आले. त्यानंतर बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने चाकण पट्ट्यात छापा मारून शरियत याला अटक केली. त्याच्यावर बिहार मध्ये दिनांक २४ मार्च २०१९ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक १/२०१९, अंडर सेक्शन १८, ३८ युएपीए, भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ सह फॉरेन ऍक्ट १४ अन्वये गुन्हा दाखल आहे. 

पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघांकडे सीआरपीएफ जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट आढळून आली होती. तसेच इतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली. यामुळे देशातील तपास यंत्रणा देखील चक्रावून गेल्या आहेत. 

खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघांच्या चौकशीत शरियत याचे नाव पुढे आले. हे तिघे जण इस्लामिक स्टेट ऑफ बांगलादेश ( आय एस बी डी )आणि आयसिस सह जमात-उल-मुजाहिद्दीन ( जेएमबी ) या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत. 

दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याची या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली आणि गोव्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई आणि गोव्यातील धर्मस्थळांवर दहशतवादी हल्ला करण्याचा दहशतवादी संघटनांचा कट आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. 

पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळवून दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारतानं पाकमध्ये घुसून एअर स्ट्राइक करत २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 

टॅग्स :Puneपुणेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद