सासवड : सासवड पोलीस प्रशासनातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी आणि पोलीस प्रशासनातील उत्कृष्ट सेवेची दखल घेत भोर उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) अण्णासाहेब जाधव यांनी केलेल्या शिफारशीवरून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये तीन महिला कर्मचाºयांचा समावेश असून, ही अतिशय उल्लेखनीय बाब मानली जात आहे.अतिशय खडतर परिस्थितीत घर आणि नोकरी सांभाळून या महिला कर्मचा-यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. चूल आणि मूल यामध्ये गुरफटून न बसता पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले ज्ञान, बुद्धिमत्ता, धाडस, साहस, यांच्या जोरावर पोलीस प्रशासनासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात या महिलांनी संसार आणि नोकरी यांचा समन्वय साधत समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींनाआळा घालण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केले आहे.या महिलांच्या कार्याची प्रेरणा आणि आदर्श पुढे ठेवून समाजातील इतर महिलांनीदेखील पोलीस प्रशासनात आले पाहिजे. युवतींनी त्यांच्या कामगिरीचा आदर्श घ्यावा.महिला पोलिसांच्या कामगिरीची दखलया कर्मचाºयांमध्ये सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेश पोळ उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण दफ्तरी कामकाज आणि महिला पोलीस नाईक वर्षा भोसले यांना उत्कृष्ट क्राईम कामकाजाबद्दल सन्मानित केले असून, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) यांच्या कार्यालयातील महिला पोलीस नाईक निशा गोरे व महिला पोलीस नाईक सुप्रिया काळे यांना उत्कृष्ट कार्यालयीन कामकाजाबद्दल प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सासवड येथील सर्व पोलीस प्रशासनाच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.पोलीस कर्मचाºयांनी चुकीचे वर्तन केल्यास जशी त्यांना शिक्षा केली जाते, तसेच चांगले व उत्कृष्ट काम केल्यास शाबासकीची थाप म्हणून त्यांची प्रशंसा केली जाणेही तितकेच गरजेचे असते, यामुळे इतर कर्मचाºयांना यातून प्रेरणा मिळून त्यांच्याकडूनही चांगले काम घडेल .- अण्णासाहेब जाधव,डीवायएसपी
उत्कृष्ट कामगिरीबद्दल चार पोलिसांचा सन्मान , अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते प्रशंसापत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 12:39 AM