शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

TET Exam scam: सौरभ त्रिपाठीला लखनऊमधून अटक; पुणे पोलिसांची उत्तर प्रदेशात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 4:34 PM

पुणे पोलिसांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला (tukaram supe) अटक केली होती

पुणे: सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात (TET Exam) पुणे पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव सौरभ त्रिपाठी आहे. त्रिपाठी हा जी. ए. सॉफ्टवेअऱ कंपनीचा निगडीत आहे. पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठीला (saurabh tripathi arrested by pune police for tet exam scam) टीईटी परीक्षा 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे.

उत्तरप्रदेशातून केली अटक-पुणे पोलिसांनी शिक्षक पात्रता परीक्षेच्या 2018 सालच्या निकालामध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात सौरभ त्रिपाठी याला ताब्यात घेतलं आहे. सौरभ त्रिपाठी हा यापूर्वी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीशी संबंधित होता. त्रिपाठीने 2018 सालच्या टीईटी परीक्षेच्या निकालात गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात उत्तरप्रदेशातील लखनऊ येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. परीक्षेसाठी अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवण्याचं काम सौरभ त्रिपाठी हा करत असल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. पुणे पोलिसांनी टीईटी भरती घोटाळा प्रकरणात यापूर्वी जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केली होती. अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक केली होती.

बंगळूरूमधून कंपनीचा तत्कालीन मॅनेजर अश्विन कुमारला अटक-

या प्रकरणात पुणे पोलिसांनी काल दोघांना ताब्यात घेतले आहे. जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीचा तत्कालीन मॅनेजर अश्विन कुमार (ashvin kumar) आणि परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे सुखदेव ढेरे (Sukhdev dere) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांमधील अश्विन कुमार याला बंगळूरुमधून अटक केली आहे. या दोन्ही आरोपींवर उमेदवारांचे निकाल बदलने, प्रश्नपत्रिकेत फेरफार करणे, पास केलेल्या उमेदवारांना खोटी प्रमाणपत्रं देणे असे आरोप आहेत.

तब्बल पाचशे उमेदवारांचे निकाल बदलले-

पोलिसांनी ज्या आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली आहे. या आरोपींनी तब्बल पाचशे उमेदवारांचे निकाल बदलले आहेत. त्यासाठी त्यांनी पाच कोटींचा व्यवहार केला असल्याची शक्यता आहे. सैन्य भरती, म्हाडा, टीईटी या परीक्षांत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात मोठं रॅकेट समोर येत असल्याने खळबळ माजली आहे. 

पुणे पोलिसांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला (tukaram supe) अटक केली होती. सुपेकडून सुरुवातीला ९० लाखांचं तर नंतर २ कोटींचं घबाड पोलिसांनी जप्त केलं होतं. त्यानंतर आज प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. ही माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षा