पुणे: TET Exam paper leak sacam: सध्या राज्यभर गाजत असलेला टीईटी परीक्षेतील गैरव्यवरहार प्रकरणाबद्दल आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीचा तत्कालीन मॅनेजर अश्विन कुमार (ashvin kumar) आणि परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे सुखदेव ढेरे (Sukhdev dere) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांमधील अश्विन कुमार याला बंगळूरुमधून अटक केली आहे. या दोन्ही आरोपींवर उमेदवारांचे निकाल बदलने, प्रश्नपत्रिकेत फेरफार करणे, पास केलेल्या उमेदवारांना खोटी प्रमाणपत्रं देणे असे आरोप आहेत.
पोलिसांनी ज्या आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली आहे. या आरोपींनी तब्बल पाचशे उमेदवारांचे निकाल बदलले आहेत. त्यासाठी त्यांनी पाच कोटींचा व्यवहार केला असल्याची शक्यता आहे. सैन्य भरती, म्हाडा, टीईटी या परीक्षांत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात मोठं रॅकेट समोर येत असल्याने खळबळ माजली आहे.
पुणे पोलिसांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला (tukaram supe) अटक केली होती. सुपेकडून सुरुवातीला ९० लाखांचं तर नंतर २ कोटींचं घबाड पोलिसांनी जप्त केलं होतं. त्यानंतर आज प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. ही माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.