पुणे:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET) निकाल झाल्याच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. येत्या सात दिवसात या समितीने प्राथमिक चौकशी अहवाल तर पंधरा दिवसात सविस्तर चौकशी अहवाल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांना सादर करावा, असा अध्यादेश सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
टीईटी निकालानंतर फेरफार झाल्याचे तसेच त्यात तुकाराम सुपे (tukaram supe) याचा आणि जी.ए. सॉफ्टवेअर (ga software) या कंत्राटी कंपनीचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. २०१९-२० मध्ये परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आलेल्या परीक्षेत गंभीर झाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीमध्ये राज्याचे शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाचे संचालक यांचा सदस्य म्हणून तर राज्य मंडळाचे अध्यक्ष यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे.