पुणे : नवरात्र आणि येणारा दिवाळी व पाठोपाठ सुरू होणारी लग्नसराई यांमुळे गेले काही महिने जीएसटी व मंदीच्या वातावरणातून कापड बाजार बाहेर आला असून, बाजारात तेजी आली आहे़ ग्राहकांचा यंदा ट्रॅडिशनल लुकमध्ये वेस्टर्न कलरना अधिक पसंती मिळत असल्याचे बाजारातील चित्र आहे़नवरात्राच्या पार्श्वभूमीवर महिलांकडून विविध नऊ रंगांच्या साड्यांना उच्च वर्गातून चांगली मागणी असून, त्याचबरोबर दिवाळीची खरेदीही सुरू झाली आहे़ कापड बाजारात सध्या काठापदराच्या साड्यांसह पैठणी, सिल्क, सिंथेटिक, ज्यूटच्या पार्टीवेअर, फॅशनेबल साड्यांना मोठी मागणी आहे़ नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कापडविके्रत्यांनी वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे़ सध्या बदलत्या ट्रेंड व फॅशननुसार विविध प्रकारचे कपडे बाजारात उपलब्ध आहेत़ टीव्ही मालिका व चित्रपटात वापरण्यात आलेल्या साड्यांचीही सध्या क्रेझ महिलांमध्ये दिसून येते़सिल्कमध्ये विविध प्रकार बाजारात आले असून, त्यात मॉडर्न कलरना चांगली मागणी आहे़ अंजिरी, रिलिक्स ग्रीन, लक्स ब्लू असे विविध कलर आले आहेत़ साड्यांमध्ये कंची, कांजीवरम, स्टोनवर्क, नेट वर्क, चिकन, गोटापत्ती वर्क आदी साड्यांना मागणी आहे़ पठाणी कुर्ता, सिंघम शर्ट, चेक्स कॉटन शर्ट, पँट असे विविध प्रकार उपलब्ध आहेत़ लग्नसराईसाठी जॅकेट, कुडताबरोबरच धोती-कुडत्याला मागणी वाढली आहे़ त्यात गोल्ड व मरुन कलर या ट्रॅडिशनल कलरबरोबरच ब्रॉईट कलरना पसंती वाढत आहे़ नवरात्र, त्यानंतर दिवाळी व पाठोपाठ येणारी लग्नसराई यांमुळे पुढील दोन ते तीन महिने कापड बाजारपेठेत चांगलीच चहलपहल असेल़नवरात्र, दिवाळी आणि लग्नसराई यांबरोबरच आता पार्टीसाठी विशेष खरेदी केली जात आहे़ ट्रॅडिशनलमध्ये आता ब्रॉईट कलरना चांगली पसंती मिळत आहे़ सणाबरोबरच आता हौस म्हणून कपडे खरेदीला महत्त्व दिले जात आहे़ बाजारात नवीन माल मोठ्या प्रमाणावर आला आहे़- अमोल येमूल, पेशवाईयंदा ज्यूट आणिड्युपिंन सिल्क हा नवीन प्रकार बाजारात आला असून, त्याला चांगली मागणी आहे़ लोकांना ट्रॅडिशनल लुक हवा असतो; पण त्याच्या जोडीला वेस्टर्न कलरला पसंती दिली जात आहे़ बाजारात अनेक नवीन कलर आले असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे़- संजय शेवानी,सिल्क म्युझियम
कापड बाजारात तेजी, ट्रॅडिशनलमध्ये वेस्टर्न कलरला पसंती; लग्नसराई, दिवाळीसाठी खरेदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 5:19 AM