पुणे: गेल्या दीड वर्षांपासून मॉल्स काही दिवसांचा अपवाद वगळता बंद आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक संकटात सापडली आहे. तसेच हजारो नागरिकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मॉल्स खुले करण्यासाठी राज्य सरकार सांगेल त्या सर्व अटींचे पालन करू, पण मॉल्स सुरू करण्यासाठी परवानगी द्या. अशी मागणी शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत सूचक वक्तव्य केलं आहे.
पवार म्हणाले, मॉल मध्ये खरेदी करण्यापेक्षा फिरणाऱ्यांची संख्या जास्त असते. एका दुकानाप्रमाणे वस्तू घेऊन लगेच बाहेर पडत नाही. त्यामुळे मॉल सध्या बंदच राहतील. मॉलमधील कर्मचारी वर्गाच्या लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यावरच मॉल सुरु करण्याबाबत विचार केला जाईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून मॉल्स काही दिवसांचा अपवाद वगळता बंद आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक संकटात सापडली आहे. तसेच हजारो नागरिकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील १५ मॉल बंद असून सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक संकटात सापडली आहे.
मॉल सुरु करण्याबाबत स्थानिक महापालिकांना निवेदन देण्याचे आवाहन
राज्यात मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड आदी शहरांत ७५ पेक्षा अधिक मॉल्स आहेत. तसेच शॉपिंग सेंटर्सचीही संख्या मोठी आहे. सलग मॉल्स बंद झाल्यामुळे मॉलचालक प्रचंड आर्थिक गर्तेत सापडले आहेत. बाजारपेठा खुल्या झाल्यावर तेथे होणारी गर्दी, सोशल डिस्टन्सिंग पाहता मॉल्समध्ये अधिक काळजी घेतली जाते. त्यासाठी मॉल्सच्या लॉबी वारंवार सॅनिटाईज केल्या जातात. त्यामुळे आवश्यक त्या अटी घालून मॉल खुले करण्याची राज्य सरकारने परवानगी द्यावी तसेच त्या बाबतचे आदेश स्थानिक महापालिकांना द्यावेत, असेही असोसिशनचे अध्यक्ष मुकेशकुमार यांनी निवेदनात म्हटले आहे.