लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वेश्याव्यवसायाची सेवा देण्यासाठी येरवड्यात कॉल सेंटर स्थापल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांसह एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.अजय ऊर्फ रुद्रमुनी श्रीशल्य हिरेमठ (रा. उडचन्न, ता. अफजलपूर, गुलबर्गा, कर्नाटक), श्रीकांत कालिदास तुळजापुरे (वय २७, रा. किणी, अक्कलकोट, जि. सोलापूर), सागर स्वामीनाथ अंबाडे (वय २४), संतोषणी कैलासचंद्र साहू (वय २६,साईबाबा मंदिराजवळ,महादेवनगर, वडगावशेरी), गणेश एजंट, प्रताप एजंट व इतर एजंटांविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी तुळजापुरे, अंबाडे अणि साहु यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.वडगावशेरीतील महादेवनगर येथील साईबाबा मंदिराजवळील विकास मुरकुटे यांच्या इमारतीत वेश्याा व्यवसायाबाबतचे कॉल सेंटर असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील सहपोलीस निरीक्षक शीतल भालेकर व सतीश ढोलेयांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा घातला असता, दोन पुरुष आणि एक महिला आढळून आली. त्यांच्याकडून १३ मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यापैकी १० मोबाईल फोन हे कॉलगर्ल्स, एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या जाहिरातीसाठी वापरले जात होते. ग्राहकांनादेखील मोबाईल फोनद्वारे अश्लील फोटो पाठविण्यात येत असल्याची माहिती तपासातून पुढे आली होती.
वेश्याव्यवसायाचे थाटले कॉल सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 3:13 AM