पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 मध्ये अटक झाल्याच्या निषेधार्थ पुण्यात झालेल्या तीव्र आंदोलनामध्ये एस.टी.महामंडळाच्या तीन बस फोडल्याच्या आरोपामधून तीन मनसैनिकांची जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.आय.पेरमपल्ली यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली. विजय शिखर, सुनंदा मानवी आणि प्रमिला पवार अशी निर्दोष मुक्त केलेल्या मनसैनिकांची नावे आहेत. राज ठाकरे यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले.
एस.टी.महामंडळाच्या तीन बस फोडण्यात आरोप असलेल्या या तिघांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये 143, 147, 149, 336, 337, 427, 353 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा 2022 मध्ये सेशन कमिट झाल्यानंतर मनसे विधि-विभाग पुणे शहर अध्यक्ष अँड.अभिषेक अरविंद जगताप व त्यांच्या संपूर्ण टीमने कोणतीही फी न आकारता विनामूल्य ही केस चालवली. वकिलांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने तिघांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपी यांचे वकील म्हणून अँड.अभिषेक अरविंद जगताप, अँड.माधवी पवार, अँड.सचिन ननावरे, अँड.नीरज महाजन, अँड.सिद्धार्थ नागोरी यांनी काम पाहिले.