Amol Kolhe: संविधान विरोधी महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करायचंय; कोल्हेंचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 07:05 PM2024-11-10T19:05:28+5:302024-11-10T19:06:35+5:30

शरद पवारांनी ज्यांना आमदारकीची संधी दिली तेच गद्दारी करून ते आज आपल्या विरोधात उभे आहेत

The anti-constitution grand coalition government has to be expelled from power; Kolhe's appeal to the public | Amol Kolhe: संविधान विरोधी महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करायचंय; कोल्हेंचे जनतेला आवाहन

Amol Kolhe: संविधान विरोधी महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करायचंय; कोल्हेंचे जनतेला आवाहन

पुणे: हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भव्य बाईक रॅली काढली. पदयात्रेतून घरोघरी जाऊन भेटीगाठीचा धडाका लावलेल्या प्रशांत जगताप यांनी भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार केला. यावेळी डॉ अमोल कोल्हेंनी महायुतीवर टीका करत या संविधान विरोधी महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याचे जनतेला आवाहन केले आहे. 

कोल्हे म्हणाले, आपल्याला महाविकास आघाडीचे विकासाचे शिलेदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. पुण्याचे महापौर, तसेच शहराध्यक्ष म्हणून प्रशांत जगताप यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. हडपसरच्या विकासाचे व्हिजन त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे हडपसरकरांनी प्रशांत जगताप यांच्या पाठीशी उभे राहावे. हडपसरचा चेहरामोहरा बदलायचा असेल, तर प्रशांतदादांसारखे नेतृत्व गरजेचे आहे. विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षांत काय दिवे लावले, हे आपण पाहिले आहे. ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना आमदारकीची संधी दिली, ते गद्दारी करून आज आपल्या विरोधात उभे आहेत. या गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली असून, २० तारखेला तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटण दाबून प्रशांत जगताप यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन तुम्हा सर्व हडपसरवासियांना करतो."

प्रशांत जगताप म्हणाले, "लोकसभेला डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करण्यात तुम्ही सर्व हडपसरकरांनी मोठी साथ दिलीत. या वेळी विधानसभेलाही आपण सर्व त्याच ताकदीने पाठीशी आहात, हे पाहून आनंद वाटतो. हडपसरला एक सुंदर, सुसंस्कृत शहर घडविण्याचा माझा प्रयत्न आहे. या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची संधी तुम्ही मला द्यावीत. शरद पवारसाहेबांचा आशीर्वाद व मार्गदर्शन घेऊन मला तुमच्यासाठी अनेक विकासकामे करायची आहेत. महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांच्या एकत्रित प्रयत्नाने आणि मायबाप जनतेच्या मतदानरूपी आशीर्वादाने मला हडपसरचा आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास वाटतो."

Web Title: The anti-constitution grand coalition government has to be expelled from power; Kolhe's appeal to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.