पुणे : गेल्या दोन आठवड्यापासून गायब झालेली थंडी शुक्रवारपासून (दि.३) पुन्हा जाणवू लागली आहे. राज्यातील काही भागात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. राज्यात काही ठिकाणी तापमान १० अंशावर आले असून, पुण्यात ११.७ अंश नोंदले गेले. येत्या दोन दिवसांत राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदियात ८.८ अंशावर नोंदले गेले.
राज्यात विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्रातील अनेक भागात सकाळपासून थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. सध्या उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कमी जास्त होत आहे. दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी कमाल तापमान कायम दिसत असून, उत्तर भारतातील तापमानात घट होऊ शकते. राज्यामध्ये काही ठिकाणी सकाळी धुक्याची चादर पहायला मिळत आहे. तसेच शुक्रवारी दुपारी उन्हाचा कडाका जाणवत होता. राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात आणखी ३ ते ४ अंश सेल्सिअसची घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
राज्यातील किमान तापमान
पुणे : ११.७नगर : १०.४कोल्हापूर : १६.५महाबळेश्वर : १२.८नाशिक : ११.३सातारा : १४.६मुंबई : २१.५धाराशिव : १३.०बीड : १०.९नागपूर : ९.०गोंदिया : ८.८