पुणे: स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ हाेत असून, गेल्या चारच दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. म्हणजेच यावर्षी जानेवारी ते जुलैमध्ये सात महिन्यातील जी रुग्णसंख्या (१२९) आढळली हाेती, तितकीच रुग्णसंख्या अवघ्या चार दिवसांत वाढत ती दुप्पट (२६०) झाली आहे.
काेराेना कमी हाेत असला तरी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आराेग्य विभागाची डाेकेदुखी आणखी वाढली आहे. शहरात १ ऑगस्टला स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या १२९ हाेती. ती रुग्णसंख्या ५ ऑगस्टला २६० वर पाेचली आहे. तर आतापर्यंत दहा रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ३ रुग्ण हे शहरातील तर ७ रुग्ण हे पुणे शहराबाहेरील आहेत.
या रुग्णवाढीबाबत विचारले असता महापालिकेचे सहायक आराेग्य अधिकारी डाॅ. संजीव वावरे म्हणाले, की काही रुग्णांचे पेंडिंग पाॅझिटिव्ह अहवाल उशिराही येत असल्याने ही संख्या वाढली आहे. तसेच रुग्णसंख्या वाढत आहे.
शहरात १६४ रुग्णांवर उपचार सुरू
शहरात वेगवेगळया खासगी रुग्णालयांत १६५ रुग्णांवर उपचार सुरू असून ८५ रुग्णांवर यशस्वी उपचार हाेऊन त्यांना घरी साेडण्यात आले आहे. तर, सध्या १४ रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.