पुणे : पुणे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर देशाचा कारभार सुरू आहे. ही घटना इतकी अचूक आहे की पुढची हजारो वर्ष बदलावी लागणार नाही. असे मत व्यक्त केले आहे.
पाटील म्हणाले, ही घटना समतेच्या बंधुत्वाच्या आधारावर आहे तर अनेक अर्थाने समानतेच्या आधारावर आहे. 1951 सालापासून झालेल्या सावत्रिक निवडणूक गरीब श्रीमंत यांना कुठल्याही जातीचा शिक्षणाचं बंधन नाही. कोणीही उभा राहू शकतो. जसा माझ्यासारखा गिरणी कामगारांचा मुलगा किंवा माझे आई-वडील सरपंच ही नव्हते तो आज महाराष्ट्राच्या मध्य मंत्रिमंडळामध्ये २०१४ पासून सलग आहे.
आरक्षणाबाबत बोलताना पाटील म्हणाले, मोदीजींनी गरिबांना शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण दिले. जातीवर अन्याय झाल्याची पार्श्वभूमी आहे. त्या धर्तीवर हे आरक्षण दिले गेले होते. घटनेमध्ये दिलेलं संविधानात्मक आरक्षण ओबीसीचे आरक्षण त्याच्या अंतर्गत मराठा आरक्षण कायद्याने दिलेले कलम १५ आणि १६ आहे. त्याच्या राज्याने आवश्यकतेनुसार द्यावं. मराठा समाजाला दिलेला आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचं ऑटोकॉट प्रयत्न सुरू आहेत. गेले दीड वर्ष झालं ते रिझर्वेशन दिलं नाही. सरकारने ज्या प्रकारे हे आरक्षण दिलं आहे ते जाणार नाही.
देवेंद्र विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद राऊतांच्या मनात
संजय राऊत जे बोलतील ते खरं न मानता ते खोट आहे असंच म्हणावं लागतं. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला 167 जागा मिळाल्या सहयोगी पक्ष म्हणून महायुतीला 235 जागा मिळाल्या. आणि या आमदारांनी देवेंद्रजी ना मुख्यमंत्री बनवले. या देवेंद्रजींनी 2014 ते 2019 आरक्षणाची सुविधा या एकमेकात अडकल्या होत्या त्या वेगळ्या केल्या. आरक्षण नसतानाही सुविधा, हॉस्टेल, आरक्षण नसतानाही भत्ता दिला. त्यांच्याविरुद्ध दलित मराठा ओबीसी जाऊ शकत नाही. ओबीसीचा मंत्रालय देवेंद्रजींनी वेगळा सुरू केले. देवेंद्र विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद संजय राऊत यांच्या मनात आहे. हा त्यांच्या मनामध्ये असलेला जातीवाद आहे. त्यांच्या मनामध्ये असलेला जातीवाद हा अस्तित्वात येऊ शकणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
चार माणसे घरात असतील तरी भांड्याला भांड लागतं
मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण दिलं नाही. हे मराठा समाजाला पहिला आरक्षण देवेंद्र फडणीस यांनी दिले. त्यामुळे त्यांना ब्राह्मण हा शब्द लागू शकत नाही. एका रक्ताचे चार माणसे घरात असतील तरी भांड्याला भांड लागतं. इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत. अजित दादांची वेगळी एकनाथ शिंदे यांची वेगळी. देवेंद्रजींची वेगळी अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीची लोक एकत्र काम करतात. खळखळ झाली म्हणजे ते जिवंत आहेत.
अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा लवकरच होणार
अमित शाह रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त समाधीचे दर्शन घ्यायला आले. समाधीचा जन्मोतदार केल्यानंतर शंभर वर्ष पूर्ण होणार होती. याचं स्वागत करायचं सोडून. संजय राऊत बोलत आहेत राजकीय दुश्मनी असावी. अमित शहा यांनी स्वतः पाचशे पानांचा शिवाजी महाराजांवर केलेलं पुस्तक पुण्यात की दिल्ली मध्ये प्रकाशित होणार हे राहिलं आहे. हे पुस्तक वाचल्या नंतर राऊतांना चक्कर येईल. इंदुमिल वरील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची किती ठेवायची याबाबत काही संघटना आम्हाला भेटला यावर चर्चा सुरू आहे. लवकरच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यालाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. त्याची ही प्रक्रिया लवकर सुरू होईल.