शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकलला; पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 5:35 PM

पंतप्रधानांच्या हस्ते होणारा मेट्रो उदघाटनाचा कार्यक्रम पाऊस असल्यामुळे रद्द नाही तर पुढे ढकलला आहे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर येणाऱ्या मोदींनी आपला दौरा रद्द केला आहे. याबाबत अजित पवारांनी माहिती दिली आहे. दौऱ्याची आम्ही पूर्ण काळजी घेतली होती पण पाऊस असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकलला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.   अजित पवार म्हणाले, आम्हाला पंतप्रधानांच्या ऑफिसमधून फोन आला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. आपल्याकडे दुपारी तीन वाजल्यापासून पुन्हा पाऊस येणार असल्याचा अंदाज दिला होता. पुणेकरांची गैरसोय होईल आणि नागरिकांना त्रास होईल त्यामुळे आम्ही पुण्यातील शाळेला सुद्धा सुट्टी दिली होती. आम्ही पूर्ण काळजी घेतली होती पण पाऊस असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकलला असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. 

मेट्रो सेवाही रद्द 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रोच्या स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होते. पंतप्रधान दुपारी ४ वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकातून मेट्रोने स्वारगेटला जाणार होते. त्यानंतर हि मेट्रो प्रवाशांसाठी सुरु होणार होती. पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना उदघाटन समारंभाला येणे शक्य होणार नाही. उदघाटन समारंभ रद्द झाल्याने जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक ही सेवा कार्यान्वित नसल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे. मेट्रो प्रवासी सेवेत आज जे इतर बदल करण्यात आले होते. ते रद्द करण्यात आले असून मेट्रो सेवा नियमितपणे सुरु राहील असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

कसा होता पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा?

पंतप्रधान दुपारी ४ वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकात येणार होते. तिथून ते मेट्रोने स्वारगेटला जाणार होते. स्वारगेटवरून गाडीने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार होती. मेट्रोसह एकूण १२ प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाचाही समावेश होता. सभेनंतर फर्ग्यूसन महाविद्यालय परिसरात त्यांच्या रोड शोचेही आयोजन करण्यात आले होते. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारMetroमेट्रोpassengerप्रवासीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस