पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ ई-शिवाई बस सोबतच ई-शिवनेरी बस देखील दाखल झाल्या आहेत. आरटीओ कार्यालयातील बस पासिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर, येत्या २-३ दिवसात या ई-शिवाई प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. १ मे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने स्वारगेट ते ठाणे या मार्गावर पहिली ई-शिवनेरी बस धावली.
टप्प्या टप्प्याने पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून ७ आणि ठाणे येथून स्वारगेट करिता ७ अशा १४ बसेस दररोज धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या पुणे विभागाचे वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.
स्वारगेट ते ठाणे बसच्या वेळा..पुणे (स्वारगेट) येथून सकाळी ६:४५, ७:४५, ८:४५, ९:४५, १०:४५, ११:४५ आणि दुपारी १२:४५ वाजता ठाण्याला जाणाऱ्या ई-शिवनेरी सुटतील.
ठाणे ते स्वारगेट बसच्या वेळा...
ठाणे येथून पुणे (स्वारगेट) साठी दुपारी १२:४५, १:४५, २:४५, ३:४५, संध्याकाळी ४:४५, ५.४५ आणि ६:४५ वाजता ई-शिवनेरी सुटतील.