रस्ता रुंदीकरणासाठी हटवलेल्या श्री दत्त मंदिराच्या भुमीपुजनाला साधला दत्तजयंतीचाच मुुहुर्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 20:12 IST2024-12-14T20:10:57+5:302024-12-14T20:12:55+5:30
सत्ता स्थापन होताच अजित पवार लागले कामाला

रस्ता रुंदीकरणासाठी हटवलेल्या श्री दत्त मंदिराच्या भुमीपुजनाला साधला दत्तजयंतीचाच मुुहुर्त
बारामती - राज्यात स्थापन होताच उपमुख्यमंत्री अजित पवार कामाला लागले आहेत.शनिवारी(दि १४) उपमुख्यमंत्री पवार यांनी पुन्हा बारामती शहरातील विकासकांमांची पाहणी केली. यावेळी पवार यांनी आज दत्तजयंतीच्या मुहूर्तावर श्री दत्त मंदिराचे भूमीचे पूजन केले.
दरम्यान, शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. रस्ते रुंदीकरणाच्या कामात दत्त मंदिर हे रस्त्यात येत होते. वसंतराव पवार मार्ग प्रशस्त करण्यासाठी श्री दत्त मंदिर रातोरात हटविण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. बारामती विधानसभा निवडणुकीत विराेधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात प्रचार करताना बारामतीतील वसंतराव पवार मार्गावरील हटविलेल्या दत्त मंदिरावरुन टीका करण्यात आली होती. निवडणुकीत हे मंदीर एकूणच चर्चेचा विषय ठरला.त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी यामध्ये लक्ष घातले आहे.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आले. दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मंदिराचे भूमिपूजन केले. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिले जाते, त्याचा प्रत्य पुन्हा एकदा बारामतीकरांना आला. पवार यांनी विधानसभेच्या सांगता सभेत , निवडणूक संपताच दत्त मंदिर हे अतिशय योग्य जागी व भव्य दिव्य उभारू असा शब्द बारामतीकरांना दिला होता. या शब्दाची पवार यांनी दत्तजयंतीचाच मुहुर्त साधत पुर्तता केली.त्यानुसार (दि.१४ ) रोजी पूर्वी असणाऱ्या मंदिरापासून काही अंतरावरच दत्त मंदिराचे भूमीचे पूजन करण्यात आले. याचवेळी दत्त मंदिर, सभा मंडप, नवग्रह मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, गणपती मंदिर आदींचे भूमिपूजनही यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले.