शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

Pune Helicopter Crash: टेकऑफनंतर अवघ्या ५ व्या मिनिटाला कोसळलं हेलिकॉप्टर; तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 1:00 PM

हेलीपॅड पासून दीड किलोमीटर अंतरावरच असणाऱ्या बावधन परिसरामध्ये धुक्याचा अंदाज आल्याने हेलिकॉप्टर कोसळले

पुणे: धुक्याचा अंदाज न आल्याने  बावधन बुद्रुक परिसरात  आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची भयंकर घटना घडली आहे. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टेकऑफ नंतर अवघ्या ५ मिनिटातच हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ऑक्सफर्ड गोड क्लब येथील टेलिपॅडवरून ७.३० वाजता हेलिकॉप्टरने टेक ऑफ केलं. त्याच्या नंतर ५ मिनिटांनी ही घटना घडली. धुक्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पुण्यातील ऑक्सिफर्ड गोड क्लब येथील हेलिपॅडवरून हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मार्गस्थ झाले होते. हेलीपॅड पासून दीड किलोमीटर अंतरावरच असणाऱ्या बावधन परिसरामध्ये धुक्याचा अंदाज आल्याने ते कोसळले. त्यामध्ये दोन पायलेट एक इंजिनियर होता. तिघांचाही या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. हेलिकॉप्टर कोसळण्याची माहिती मिळताच पुणे आणि पीएमआरडी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परमजित राम सिंग (वय ६४) आणि गिरीश कुमार पिल्लाई (वय ५३) अशी मृत्यू पावलेल्या दोन कॅप्टनची नावे आहेत. तर प्रीतम चंद भारद्वाज (वय ५६) असे त्या इंजिनीअरचे नाव आहे. याअगोदरही बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली होती. वारंवार होणाऱ्या घटनेचं नेमकं कारण अजूनही समजू शकले नाही. आज सकाळी घडलेल्या घटनेने पायलट प्रशिक्षणार्थी होते का? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. बावधन परिसरात सकाळी एवढं धुकं असतानाही त्यांनी टेक ऑफ का केलं? असा सवालही उपस्थित होतोय.  

टॅग्स :PuneपुणेHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूFire Brigadeअग्निशमन दल