पुणे: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर महायुतीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. नराधमाला फाशी दिल्याबद्दल पोलीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यात आले. तर मुंबईत काही ठिकाणी फडणवीस हे हातात बंदूक असलेले पोस्टर लावण्यात आले. यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणार हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. जे मुल ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील? या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. मिर्जापुर टीव्ही सिरीयल मध्ये अशा गोष्टी चालतात. हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा देश बंदुकीने नाही चालणार तर संविधानाने चालणार. देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावे आम्ही संविधान दाखवू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
पुण्याच्या विकासासाठी अपुरा निधी दिला जातोय असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, आम्ही जो निधी मागतो त्यावर फुली मारली जाते. आम्हाला निधी दिला जात नाही. जनतेचे काम करण्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागत आहोत. हे संविधान विरोधी आहेत. विरोधक असला तरी आमच्या काळात निधी दिला जात होता. आमच्या काळात विरोधकपण निधी देत होते असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या पुणे दौरा होणार आहे. त्याबाबत बोलताना विकासकामांच्या निधीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मी सहाव्यांदा पुण्यात मेट्रो उद्घाटन करण्याठी येत आहे. मोदींच्या ऑफिसला सांगितले नसेल की आपण एकाच मेट्रो कार्यक्रमाला जात आहे. हे मोदींना माहिती नसावं. आम्ही आमच्या मतदारसंघातील लोकांसाठी आज निधी मागत आहोत. त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातंय.