शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

Indian Navy: भारतीय नौदलातील ६० लढाऊ जहाजे, पाणबुड्या अन् ५० लढाऊ विमाने देणार मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 7:31 PM

विशाखापट्टणम येथे सोमवारी (दि 21) प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू कार्यक्रमाअंतर्गत नौदल आपले सामर्थ्य दाखवणार

निनाद देशमुख

विशाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे सोमवारी (दि 21) प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू कार्यक्रमाअंतर्गत नौदल आपले सामर्थ्य दाखवणार असून तब्बल 60 लढाऊ जहाजे, पाणबुड्या आणि 50 लढाऊ विमाने विविध कवायती सादर करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार आहे. प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू हा दर 5 वर्षांतून एकदा आयोजित केला जातो. या वर्षी स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे. प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू हा नौदलाची मनाची कवायत समजली जाते. या कवायती अंतर्गत तिन्ही दलाचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपती यांना एका विशेष फॉर्मेशन मध्ये येत मानवंदना दिली जाते. नौदलाची सर्व लढाऊ जहाजे, विनाशिका, पाणबुड्या विमानवाहू जहाज यांचा समावेश असणार आहे. नौदलातर्फे या कवायतीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्ती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद नोंदलाची मानवंदना स्वीकारणार आहेत. या प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथसिंह, मिनिस्टर ऑफ स्टेट देव सिन्हा चव्हाण, नौदल प्रमुख उपस्तीत राहणार आहेत. भारतीय नौवहन निगम, राष्ट्रीय महासागर प्रौद्योगिकी संस्थान, पाणबुडी विकास विभाग या वर्षी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या सोबतच तटरक्षक दलाचे जहाजे आणि 50 हेलिकॉप्टर सुद्धा यात सहभागी होणार आहेत.   प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू कवायत ही जगात सर्व देशामार्फत केली जाते. युद्धाच्या परिस्तितीत नौदल कशाप्रकारे सज्ज आहे आणि नौदलाची किती क्षमता आहे. हे या कवायटीतून दाखवले जाते. सर्वात प्रथम 1953 मध्ये प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू पाहिल्यादा आयोजित करण्यात आला होता. आता पर्यंत 11 वेळा प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे. शेवटचा प्रेसिडेंट फ्लीट रेव्हिएव कवायत 2016 मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनामुळे यात विलंब झाला. 

नौदलाचे शक्ती प्रदर्शन 

प्रेसिडन्ट फ्लीट रेव्हिएवच्या माध्यमातून भारतीय नौदलाच्या ताकदीचे प्रदर्शन केले जाणार आहे. या वर्षी कवायतीती सामील होणारी लढाऊ जहाजे ही भारतीय बनावटीची आहेत. यातून देशी तंत्रज्ञान आणि जहाज निर्मितीला चालना दिली जाणार आहे. च्या माध्यमातून भारतीय नौदलाच्या ताकदीचे प्रदर्शन केले जाणार आहे. या वर्षी कवायतीती सामील होणारी लढाऊ जहाजे ही भारतीय बनावटीची आहेत. यातून देशी तंत्रज्ञान आणि जहाज निर्मितीला चालना दिली जाणार आहे. या सोबतच हिंद महासागरात केवळ भारताच दबदबा आहे हा संदेश सुद्धा भारताला द्यायचा आहे. 

पहिला फ्लीट रिव्यू 18 व्या शतकात मराठ्यांनी केला होता आजोजित

भारतात पहिला प्रेसिडेंट फ्लीट रेव्हिव्ह्यू कवायत 18 व्या शतकात आयोजित करण्यात आली होती. मराठा साम्राज्याचे कान्होजी आंग्रे यांनी पश्चिम तटावरील रत्नागिरी येथे मराठी साम्राज्याच्या लढाऊ जहाजांना एकत्रित केले होते.

टॅग्स :IndiaभारतForceफोर्सPresidentराष्ट्राध्यक्षairforceहवाईदलWaterपाणी