विकासाचा मुद्दा राहिला बाजूला; शिरुरचे उमेदवार उणीदुणी काढण्यात व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 10:07 AM2024-05-10T10:07:23+5:302024-05-10T10:08:07+5:30

मतदारांचा एकच प्रश्न, विकासकामांचे काय करणार ते बोला 

The issue of development was left aside in Shirur lok sabha; Candidates are busy sorting out the gaps | विकासाचा मुद्दा राहिला बाजूला; शिरुरचे उमेदवार उणीदुणी काढण्यात व्यस्त

विकासाचा मुद्दा राहिला बाजूला; शिरुरचे उमेदवार उणीदुणी काढण्यात व्यस्त

- दुर्गेश मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तीन टर्म खासदार राहिलेल्या  शिवाजीराव आढळराव पाटील यांना २०१९ मध्ये पराभूत करून डॉ. अमोल कोल्हे जवळपास ५८ हजार मतांनी विजयी झाले होते. तेव्हाची आणि आजची राजकीय गणिते पूर्णपणे बदलेली आहेत. कोल्हे यांच्या पाठीमागे एकसंघपणे असलेली राष्ट्रवादीची ताकद यंदा विभागली गेली असून काँग्रेस आणि उद्धवसेनेचे त्यांना बळ मिळत आहे. तर भाजप, अजित पवार गट आणि शिंदेसेना एकत्र आल्यामुळे शिरुर मतदार संघात अटीतटीची लढाई होणार आहे. 

 या रणधुमाळीत दोघांनीही पहिल्या दिवसापासून एकमेकांना टार्गेट केले आहे. ही निवडणूक विकासात्मक मुद्द्यांवर कमी आणि एकमेकांची उणीधुणी काढण्यात जात आहे. स्थानिक राजकीय समीकरणे जरी बेरजेचे असली तरी अंतर्गत कलह या मतदारसंघात बघायला मिळू शकतो, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. 

या मतदारसंघातील  भोसरी, चाकण, तळेगाव, शिक्रापूर आणि रांजणगाव भागातील औद्योगिक वसाहतींचे प्रश्न या निवडणुकीत निर्णायक 
ठरणार, असे चित्र दिसत आहे.

सामाजिक समीकरणाची रणनीती
n शिरूरची निवडणूक अटीतटीची होऊ लागली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले असून, डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर अपेक्षित अशी उत्तरे दिली आहेत. 
n जातीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यासही सुरुवात झाली आहे. कोल्हे यांना माळी समाजाने पाठिंबा दिला आहे. एकही मत चुकता कामा नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. 

आढळराव पाटील यांचे आव्हान
n महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी विकासाच्या मुद्द्यांवर डॉ. अमोल कोल्हे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. 
n मात्र, त्याला त्यांनी सडतोड उत्तरे दिली आहेत. दरम्यान संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून डॉ. कोल्हे यांनी आढळरावांना घेरले. त्यामुळे विकासाचा मुद्दा मागे पडून एकमेकांची उणीदुणी काढण्यात दोन्ही उमेदवार व्यस्त असल्याचे चित्र आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
चाकण, नगर रोडवरील वाहतूक काेंडीमुळे औद्योगिक वसाहतीमध्ये एकही नवीन उद्योग न आल्याने रोजगार निर्मिती नाही 
 पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेची संकल्पना आणली. प्रकल्पाला गती मिळाली. जुन्नरच्या जीएमआरटीमुळे रेल्वे प्रकल्पाचे घोडे अडले. यातून मार्ग काढण्यासाठी कोणीही पुढे येईना. 

कोरोना काळात शिरुर मतदारसंघात मध्यवर्ती ठिकाणी मोठे रुग्णालयाची आवश्यकता भासली. त्यातूनच इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्पाचा जन्म झाला. परंतु, हा प्रकल्प नक्की काय आहे. तो कुठे होणार याबाबत अजूनपर्यंत लोकांना स्पष्ट माहिती नाही आहे. 
 

Web Title: The issue of development was left aside in Shirur lok sabha; Candidates are busy sorting out the gaps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.