शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! महाविद्यालयातून द्या, कराटे प्रशिक्षण, विद्यापीठांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 12:57 PM

राज्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविणे ही काळाची गरज आहे

पुणे : राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतशिक्षण घेणाऱ्या मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मुली शैक्षणिक अभ्यासासाेबतच शारीरिकदृष्ट्या सक्षम हाेण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे गिरविणार आहेत. उच्च शिक्षण संचालकांनी मुलींसाठी किमान एकदा तीन महिने कालावधीचा कराटे प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवावा, अशी सूचना शिक्षण संस्थांना करावी, असे आदेश राज्यातील विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक आणि अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत.

राज्याचे महिला धोरण- २०१४ मधील मुद्दा क्र. ६.१३ नुसार ‘सर्व शिक्षण संस्थांनी मुलींसाठी तीन महिन्यांचा कराटे प्रशिक्षण कार्यक्रम किमान एकदा राबवावा’ असे नमूद केले आहे. राज्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी महिला धाेरणानुसार महाविद्यालयीन आणि शालेय मुलींसाठी कराटे प्रशिक्षण वर्ग तत्काळ सुरू करावेत, अशी मागणी दीपू फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षण संचालनालयाकडे करण्यात आली हाेती. त्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाचे संचालकांनी गुरुवार दि. ५ राेजी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये राज्यातील उच्च शिक्षण विभागाच्या सर्व विभागीय सहसंचालक आणि अकृषी, अभिमत, स्वयं अर्थसाहाय्यित विद्यापीठांच्या कुलसचिवांनी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना तीन महिने कराटे प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवावा, अशी तातडीने सूचना द्यावी, असे नमूद केले आहे.       विभागीय सहसंचालक कार्यालय तसेच विद्यापीठांनी सूचना दिल्यानंतर महाविद्यालयांनी केलेल्या कराटे प्रशिक्षण वर्गांचा अहवाल संकलित करून एकत्रित स्वरूपात उच्च शिक्षण संचालनालयास सादर करावा लागणार आहे. ज्या महाविद्यालयांनी निर्देशानुसार कार्यवाही केली नाही, त्यांच्यावर काय कारवाई केली, याचाही अहवालही सादर करावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

विद्यापीठांनी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियाेजन करावे. तसेच संलग्न महाविद्यालयांत हा संवेदनशील उपक्रम राबविण्यासाठी गांभीर्याने काम करावे. सर्व विद्यापीठांकडून यासंदर्भात आढावा घेणार आहाेत. - डाॅ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाSocialसामाजिकcollegeमहाविद्यालयMolestationविनयभंगPoliceपोलिसEducationशिक्षण