शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

'द केरळ स्टोरी' महाराष्ट्रात करमुक्त करावा; पुणे भाजपच्या शहराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By निलेश राऊत | Published: May 10, 2023 5:53 PM

काही दिवसांपासून वादात अडकलेला 'द केरळ स्टोरी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय

पुणे: दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.       मुळीक म्हणाले, 'हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून वास्तव दाखविणारा आहे. केरळमधील ३२ हजार मुली अचानक गायब झाल्या. त्यानंतर त्यांचे धर्मांतर करून 'इसिस' या दहशतवादी संघटनेत सामील केले गेले, असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या विषयाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा ज्यामुळे तो अधिकाधिक नागरिकांना पाहता येईल. सध्या हा चित्रपट शहरातील सर्व सिनेमागृहात हाऊस फुल चालला असून, चित्रपट पाहण्यासाठी महिला वर्ग ही मोठ्या प्रमाणात येत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेला 'द केरळ स्टोरी'(The Kerala Story) चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटावर भारतात बंदी घालण्याची मागणी होत असताना, आता हा चित्रपट 37 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अदाह शर्मा या मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर अनेकांकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत होती. पण, सेन्सॉर बोर्डाने चित्रपट पास केल्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला अन् प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण, तामिळनाडूसह पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील या चित्रपटाने पाच दिवसांत 55 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

टॅग्स :PuneपुणेAdah Sharmaअदा शर्माcinemaसिनेमाartकलाcultureसांस्कृतिकKeralaकेरळ