"तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात, मीच ती ओपन केली नाही तर काय घंटा मिळणार?"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 09:36 AM2022-03-28T09:36:21+5:302022-03-28T09:37:02+5:30

बारामतीतील कार्यक्रमात अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

The key to the safe is in my hand, if I don't open it, what will be the bell?, Says ajit Pawar | "तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात, मीच ती ओपन केली नाही तर काय घंटा मिळणार?"

"तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात, मीच ती ओपन केली नाही तर काय घंटा मिळणार?"

Next

बारामती : दत्तामामा बांधकाम खात्याचे राज्यमंत्री आहेत. बांधकाम खात्याच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. मात्र, या राज्याचा वित्तमंत्री मी आहे. त्यामुळे तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मीच ती ओपन केली नाही तर काय घंटा मिळणार? अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना चिमटा काढला. 

निंबुत (ता. बारामती) येथे रविवारी एका  उद्घाटन कार्यक्रमामध्ये  उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.  ते म्हणाले, संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा नीरा-बारामती रस्ता महत्त्वाचा आहे. बांधकाम खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे येथे उपस्थित आहेत. दत्तामामा, तुम्ही नुसते इंदापूर तालुक्याकडे लक्ष देऊ नका. मलादेखील या बाबाला विनंती करावी लागते. आमच्या तालुक्यातील रस्त्यांना देखील निधी द्या, अशी मिश्कील टिप्पणी करीत पवार पुढे म्हणाले, बांधकाम खात्याच्या चाव्या दत्तामामांच्या हातात असल्या तरी वित्तमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या माझ्या  हातात आहेत. मीच निधी दिला नाही तर काय घंटा मिळणार?  अजित पवार यांच्या या अनपेक्षित शाब्दिक वारामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे चांगलेच गोंधळले. तर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

Web Title: The key to the safe is in my hand, if I don't open it, what will be the bell?, Says ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.