शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

प्रतिभावंत लेखकाला अखेरचा निरोप; 'मुक्तांगण' चे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:51 IST

सामाजिक क्षेत्रात ‘बाबा’ म्हणून ते सर्वांना परिचित असून व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी डॉ. अवचट यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पुणे: उपेक्षितांच्या आगतिक आयुष्याची ओळख करून देणा-या विविधांगी विषयांवर लेखन करणारे प्रतिभावंत लेखक, ओरिगामी, लाकडातील शिल्पकाम, फोटोग्राफी, चित्रकला, बासरी आदी कलाप्रांतात लीलया भ्रमंती करणारे अष्टपैलू कलावंत आणि व्यसनमुक्तीसाठी अविरतपणे लढा देणारे ‘मुक्तांगण’ चे संस्थापक  डॉ. अनिल अवचट (वय 77) यांचे निवासस्थानी गुरूवारी निधन झाले.

सामाजिक क्षेत्रात ‘बाबा’ म्हणून ते सर्वांना परिचित होते. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी डॉ. अवचट यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अवचट यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वीच घरी आणण्यात आले होते. मात्र, गुरूवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि निवासस्थानीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात कन्या मुक्ता पुणतांबेकर आणि यशोदा वाकणकर, जावई, नातवंडे तसेच मित्रमंडळी असा मोठा परिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पत्रकार नगर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास कोणत्याही धार्मिक विधींशिवाय त्यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

अल्प परिचय 

पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून  एम.बी.बी.एस ची पदवी घेतल्यानंतर त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत त्यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. बिहार मधील अनुभवांवरील सामाजिक लेखांचा समावेश असलेलं 'पूर्णिया' हे त्यांचं पहिलं पुस्तक 1969 साली राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले होते. त्यानंतर डॉ. अवचट यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना लेखनाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम केले.'कोंडमारा' हा दलित अत्याचारांवरील सामाजिक लेखांचा त्यांचा संग्रह विशेष गाजला, तर 'माणसं' या पुस्तकाव्दारे त्यांनी हमाल, विडीकामगार, वैदू यांच्या सामाजिक जीवनाचा लेखाजोखा मांडला. 'कार्यरत', 'छंदांविषयी', 'स्वत:विषयी', 'गर्द', 'पुण्याची अपूर्वाई', 'सृष्टीतगोष्टीत' आणि 'सुनंदाला आठवतांना' ही त्यांची पुस्तकंही विशेष गाजली. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कारासह प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 2021 चा ‘‘जीवनगौरव पुरस्कार'  तर सृष्टीत.. गोष्टीत या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या अकस्मिक निधनाने सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकAnil Avchatअनिल अवचटDeathमृत्यू