पुणे: कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपनं सर्व ताकद पणाला लावली. गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात हजेरी लावली होती. अर्ध मंत्रिमंडळ प्रचाराला आलं होतं. मात्र, त्याचा फारसा फायदा हेमंत रासनेंना झाल्याचं पोटनिवडणुकीत दिसलं नाही. तब्बल 30 वर्षांनी भाजपने पारंपारिक मतदारसंघ गमावला आहे. संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ०४० मतांनी पराभव झाला. गोरगरिबांचा आणि आमच्या हक्काचा माणूस निवडून आल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर कसबा मतदारसंघातील सामान्य नागरिकांच्या मदतीला धावणारा, सुख दुःखात सहभागी होणारा,फेरीवाले, हातगाडीवाले ,दवाखान्यात बिल संदर्भात मदत, अतिक्रमण असो अन्य सरकारी कागदपत्रे असो अशा सर्व कामांसाठी धंगेकर धावून येतात. स्वत मदत करणारा आमचा गोरगरिबांचा हक्काचा माणूस निवडून आल्याने नागरिकांनी आनंद उत्सव साजरा करत आहेत.
''कॉस्मेटिक लेडीज सौंदर्यचा स्टॉल शर्मिली चौकात आहे. दुकान उभरण्यापासून मदत केली. केव्हाही कसले काम असेल तर मदतीला धावून येतात. - कल्पना शिंदे- कसबा पेठ''
''तांबट चौकात केटरर्स व्यवसाय आहे. रविभाऊ स्वतः पुढाकार घेऊन नेहमी मदतीला धाऊन येतात. रवि भाऊ विजयी झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हा सर्व कुटुंबाला आनंद होत आहे. हा सत्याचा विजय आहे. - वनिता जगताप, तांबट चौक रास्ता पेठ'' ''सोमवार पेठ या ठिकाणी केक शॉप दुकान आहे. धन शक्ती विरोधी जनशक्तीचा विजय आहे. गाडीवाले, फेरीवाले सामान्यांचा रविभाऊ असल्याने लहानापासून मोठ्यांपर्यंत हे सर्वांना मदत करीत आले आहेत. यामुळे यांचा विजयाने आम्हा सर्व परिसरातील लोकांना आनंद होत आहे. - मनीषा सरोदे, सोमावर पेठ केक शॉप दुकान''
''प्रभागात वीस ते पंचवीस वर्षे हे नगरसेवक राहिल्यामुळे रवीभाऊंना सर्वसामान्य गरिबांची जाण आहे. यामुळे यांना सर्व नागरिकांनी एकमताने निवडून दिले. रविभाऊ आमच्या हक्काचा आहे त्यामुळे या विजयाने सर्वत्र आनंद उत्सव साजरा होत आहे. सत्याच्या लढाईत आम्ही विजय झालो. - मीना पवार, रास्ता पेठ''
''रात्र दिवस प्रचार करुन जनतेपर्यंत पोहोचून काम केलं या कष्टाचे चीज झाले आहे. सर्व जाती धर्मासाठी काम केल्यामुळे हा सत्याचा विजय मानला जात आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत असल्याचे कसबा मतदारसंघांमध्ये जनतेने दाखवून दिले. - सचिन बगाडे, काची आळी''